शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आईला होत असलेली मारहाण त्याला सहन झाली नाही.. आणि त्याने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 13:43 IST

आईला वडिलांकडून बेदम मारहाण होत असल्याचे पाहून असह्य होवून एका मुलाने वडिलांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शहरातील आंबेडकर वॉर्डात घडली.

ठळक मुद्देमुलाचे पोलिसात आत्मसमर्पण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आईला वडिलांकडून बेदम मारहाण होत असल्याचे पाहून असह्य होवून एका मुलाने वडिलांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शहरातील आंबेडकर वॉर्डात शुक्रवारी दुपारी ३ वाजता घडली. वडिलांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर मुलाने पोलीस ठाण्यात जावूून आत्मसमर्पण केले.अरुण हिरालाल गुडे (५०) असे जखमी वडिलांचे नाव आहे. तर दीपक अरुण गुडे (२२) रा. आंबेडकर वॉर्ड, चांदणी चौक, भंडारा असे आरोपी मुलाचे नाव आहे. अरुण आणि पत्नी वेगवेगळे राहतात.

पत्नीसोबत दीपक नावाचा मुलगा राहतो. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अरुण पत्नीच्या घरी गेला. क्षुल्लक कारणावरुन वाद सुरु झाला. या वादात त्याने पत्नीला मारहाण सुरु केली. दीपकने मध्यस्ती करुन वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु वडील ऐकत नव्हते, उलट आईला अधिक जोराने मारहाण करायला लागले. त्यामुळे असाह्य होवून दीपक ने चाकूने वडील अरुणवर चाकूने वार केला. हा वार मानेवर आणि पाठीवर लागून खोल जखमा झाल्या. या घटनेनंतर अरुणला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर वडिलांवर हल्ला करणारा दीपक थेट भंडारा शहर पोलीस ठाण्यात पोहोचला.

आपण वडिलांवर चाकूने वार केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, ठाणेदार बंडोपंत बन्सोडे यांच्यासह डीबीचे पोलीस उपनिरीक्षक अमरदीप खाडे, गिरीष राणे, ओमकार श्रीवास, बाबू भुसावळे, साजन वाघमारे, प्रशांत भोंगाडे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी