शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

जंगलव्याप्त परिसरातून धावणाऱ्या डिझेल रेल्वेची वाहतूक धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 06:00 IST

तुमसर-तिरोडी दरम्यान ४५ किमी चे अंतर आहे. त्यापैकी किमान २० ते २५ किमी रेल्वेचा ट्रॅक घनदाट जंगलातून जात आहे. सातपुडा पर्वत रांगातून हा संपूर्ण रेल्वे मार्ग जात आहे. मॅग्नीजची वाहतूक करण्याकरिता ब्रिटीशांनी सदर रेल्वे मार्ग तयार केला होता. सध्या मालवाहतूक व प्रवाशी गाड्या या मार्गावरून दररोज धावतात.

ठळक मुद्देब्रिटीशकालीन रेल्वेमार्ग। सातपुडा पर्वतरांगातमध्ये वन्यप्राण्यांचे वास्तव्य

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर रोड-तिरोडी ब्रिटीशकालीन रेल्वेमार्गाचे अद्यापही विद्युतीकरण झालेले नसल्याने सातपुडा पर्वतरांगेतील राखीव जंगलातून धावणाºया डिझेल इंजिनने वाहतूक सुरु आहे. रेल्वेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वन्यप्राण्यांचा एकांतवास धोक्यात आला आहे.नागपूर विभागात रेल्वेला सर्वात जास्त महसूल या मागातूनच प्राप्त होत असल्याने प्रशासनाची याकडे डोळेझाक होत आहे. जगप्रसिद्ध खाणीतील मॅग्नीज वाहतुकीमुळे रेल्वेला मोठा महसूल येथे मिळत आहे.तुमसर-तिरोडी दरम्यान ४५ किमी चे अंतर आहे. त्यापैकी किमान २० ते २५ किमी रेल्वेचा ट्रॅक घनदाट जंगलातून जात आहे. सातपुडा पर्वत रांगातून हा संपूर्ण रेल्वे मार्ग जात आहे. मॅग्नीजची वाहतूक करण्याकरिता ब्रिटीशांनी सदर रेल्वे मार्ग तयार केला होता. सध्या मालवाहतूक व प्रवाशी गाड्या या मार्गावरून दररोज धावतात.विद्युतीकरणाचा प्रस्ताव नाहीरेल्वेचे सर्वत्र विद्युतीकरण होत आहे. परंतु तुमसर-तिरोडी रेल्वेमार्गाचा अद्याप विद्युतीकरणाचा प्रस्ताव नसल्याची माहिती आहे. नागपूर विभागात सर्वात जास्त महसूल रेल्वेला या मार्गावरुन मिळत आहे.जंगलातून जाणारा रेल्वे मार्गतुमसर परिसर जंगलव्याप्त आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी वास्तव्य करतात. डिझेल इंजिनचा घोंगावणारा आवाज त्यांचा एकांतवास भंग करतात. वन्यप्राणी वास्तव्याला असणाऱ्या मार्गाला संरक्षित क्षेत्र घोषीत करण्याचा नियम आहे. यापूर्वी कोळसाचा वापर रेल्वे इंजिनसाठी केला जात होता आता डिझेलचा वापर होत आहे.लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूततुमसर-तिरोडी रेल्वे मार्ग उत्तर भारतात जाणारा महत्वपूर्ण रेल्वेमार्ग आहे. रेल्वेस्थानकाचा विकास व इतर सोयी सुविधा येथे प्रवाशांना मिळत नाहीत. अस्तित्वात असलेले रेल्वेस्थानक शेवटची घटका मोजत आहे. कोट्यवधींचा महसूल देणारा रेल्वेमार्गावर किमान विद्युतीकरण करण्याची गरज असून सुविधा वाढवण्याची आवश्वकता आहे.

टॅग्स :railwayरेल्वे