शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात वीज खांबाने व्यापला अर्धा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:39 IST

शहरातील विनोबा नगरात अर्धा सीमेंट रस्ता व्यापून टाकणारा विजेचा खांब मागील सहा ते सात वर्षापासून उभा आहे. वळण रस्त्यावर हा खांब अतिशय धोकादायक असून वर्दळीच्या मार्गावर आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक तक्रारी संबंधित विभागाला केल्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. नवीन रस्ता बांधकामानंतर रस्त्याच्या बाजूला भराव न केल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्देबावनथडी कॉलनी परिसरातील प्रकार : सिमेंट रस्त्यावरील मुरुमाचा भराव केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शहरातील विनोबा नगरात अर्धा सीमेंट रस्ता व्यापून टाकणारा विजेचा खांब मागील सहा ते सात वर्षापासून उभा आहे. वळण रस्त्यावर हा खांब अतिशय धोकादायक असून वर्दळीच्या मार्गावर आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक तक्रारी संबंधित विभागाला केल्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. नवीन रस्ता बांधकामानंतर रस्त्याच्या बाजूला भराव न केल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.विनोबा नगरात बावनथडी कॉलनी परिसरात सीमेंट रस्त्यावर विजेचा खांबाने अर्धा रस्ता व्यापला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता येथे वर्तविण्यात येत आहे. या रस्त्याने विद्यार्थी परिसरातील नागरिकांची मोठी वर्दळ आहे. रात्री अंधारात खांबाला वाहने धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन सीमेंट रस्ता बांधकाम करताना सदर विजेचा खांब हटविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे केली होती. आतापर्यंत अनेक निवेदने देण्यात आली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. येथे एखादा अपघात घडल्यानंतर वीज वितरण कंपनी दखल घेणार काय] असा प्रश्न उपस्थित होत आहे. उच्चदाबाच्या वीज वाहिन्या सदर खांबावरून जात आहेत. नागरिकांच्या तक्रारींना येथे केराची टोपली दाखविली जात आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी लावला आहे. सीमेंट रस्ता बांधकामानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरुम घालण्यात आले नाही. त्यामुळे वाहन अनियंत्रित होऊन अथवा रात्रीच्या सुमारास वाहन रस्त्याच्या खाली उतरून अपघाताची शक्यता आहे. रस्त्याखालील जागा मुरुमाने भराव करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.