शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अवकाळी पावसासह गारांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 05:00 IST

मंगळवारपासून जिल्ह्यात वातावरणात बदल हाेवून ढगाळ वातावरण निर्माण झाले. मंगळवारी रात्री जिल्ह्याच्या काही भागांत तर बुधवारी सकाळी भंडारा शहरासह तालुक्यात पाऊस बरसला. बुधवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह भंडारा शहरात तब्बल अर्धा तास जाेरदार पाऊस बरसला. त्यानंतर गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट हाेवून वेगाने वाहणाऱ्या वाहनासाेबत पाऊस बरसला.

ठळक मुद्देरबी पिकांचे नुकसान : आसगाव परिसराला वादळाचा तडाखा, तुरीच्या आकाराच्या गारा

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत तीन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल हाेवून अवकाळी पाऊस बरसत आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी दुपारी जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसला तर भंडारा, साकाेली, लाखनी आणि माेहाडी तालुक्यांतील काही भागात गारांचा वर्षाव झाला. भंडारा शहरात तीन ते चार मिनीट तुरीच्या आकाराएवढ्या गारांसह अर्धा तास पाऊस बरसला. पवनी तालुक्यातील आसगाव परिसराला वादळी पावसाचा तडाखा बसला. मंगळवारपासून जिल्ह्यात वातावरणात बदल हाेवून ढगाळ वातावरण निर्माण झाले. मंगळवारी रात्री जिल्ह्याच्या काही भागांत तर बुधवारी सकाळी भंडारा शहरासह तालुक्यात पाऊस बरसला. बुधवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह भंडारा शहरात तब्बल अर्धा तास जाेरदार पाऊस बरसला. त्यानंतर गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट हाेवून वेगाने वाहणाऱ्या वाहनासाेबत पाऊस बरसला. यावेळी भंडारा शहराच्या काही भागात तुरीच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. यासाेबतच साकाेली, लाखनी आणि माेहाडी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. गारांचाही वर्षाव झाला. पवनी तालुक्यातील आसगाव परिसरात गुरुवारी दुपारी २ वाजता वादळासह पावसाला सुरुवात झाली. यात रबी पीकांचे माेठे नुकसान झाले. शेतात उभी असलेली पिके जमिनीवर आडवी झाली तर कापणी झालेला चना, वटाणा, गहू, तूर, लाख, लाखाेरी आदी रबी पिकांसह कडपा ओल्या झाल्या. साधारणत: एक तास झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची झाेप उडाली. रबी पिकांचे चुरणे थांबले. गुरांचा चारा ओला झाला. त्यामुळे ताे काळा पडणार आहे. काही शेतकऱ्यांनी धानाचे पाेते रचून ठेवले हाेते. तेही ओले झाले. भंडारा तालुक्यातील पहेला परिसरात वादळीवाऱ्यासह दुपारी २ वाजेच्या सुमारास जाेरदार हजेरी लावली.लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसराला अवकाळी पावसाचा फटका बसला. या पावसामुळे बागायती शेतीसह कडधान्य पिकांचे नुकसान झाले. धान खरेदी केंद्रात सध्या उघड्यावर खरेदी सुरु आहे. हजाराें क्विंटल धान पावसात ओले झाले. गत चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून आद्रता व गारव्यामुळे धान पिकाला खाेडकिडींचा त्रास हाेत आहे.लाखांदूर तालुक्यातील विरली बुज. परिसरात अवकाळी पावसाने गुरुवारी दुपारी हजेरी लावली. रबी पिकांचा कडपा आणि जमा केलेल्या ढिगांमध्ये पाणी शिरुन माेठे नुकसान झाले. मुंग वाटाणा, उडीद, लाख, लाखाेरी आदी पीक काढणीचा हंगाम सुरु आहे. शेतात कडपा पसरलेला आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले. यासाेबतच जिल्ह्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. दिवसभर वातावरणात प्रचंड गारवा जाणवत हाेता.

शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट गत खरीप हंगामापासून शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू आहे. सुरुवातीला अतिवृष्टीनंतर महापूर आणि धान काढणीच्यावेळेस किडींचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना रबी हंगामाकडून माेठी आशा आहे. उन्हाळी धानासह गहू, हरभरा, लाखाेरीतूर आदी पिकांची पेणी करण्यात आली. मात्र गत तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका या पिकांना बसत आहे. कापणी झालेले पीक ओले हाेत असून आधारभूत खरेदी केंद्राबाहेरील धानही ओले हाेत आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती