शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

उघड्यावर शौच करणाऱ्यांना दिली गुलाबाची फुले

By admin | Updated: February 1, 2017 00:21 IST

शौचालय बांधून गाव हागणदारीमुक्त व निर्मलग्राम करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शौचालय बांधकामासाठी आर्थिक मदत देण्यात येत असले ...

गुडमॉर्निंग पथकाची गांधीगिरी : तुमसर तालुक्यातील उमरवाड्यात सकाळीच उडाली धावपळभंडारा : शौचालय बांधून गाव हागणदारीमुक्त व निर्मलग्राम करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शौचालय बांधकामासाठी आर्थिक मदत देण्यात येत असले तरी अजूनही अनेक ग्रामस्थ उघड्यावर शौचास जातात. यामुळे अशांवर कारवाई करण्याच्या हेतूने प्रशासन सज्ज झाले आहे. तुमसर तालुक्यातील उमरवाडा येथील आज पहाटेच गुडमॉर्निंग पथक दाखल झाले. त्यांनी गांधीगिरीच्या माध्यमातून उघड्यावर शौच करणाऱ्यांना गुलाबाची फुले दिली. या कारवाईने गावात सकाळी मोठी धावपळ बघायला मिळाली. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाच्या माध्यमातून वैयक्तिक शौचालय बांधून वापरण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ३१ मार्च पर्यंत शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट प्रशासनाला देऊन जिल्हा हागणदारीमुक्त करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शौचालय बांधकाम करण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. तुमसरचे गटविकास अधिकारी गिरीश धायगुडे यांच्या नेतृत्वात उमरवाडा येथे गुडमॉर्निंग पथकाने पोलीस विभागाच्या सहकार्याने पहाटेलाच गाव गाठले. बोरी तुमसर रोड, तुमसर उमरवाडा रोड, सितेपार रोड पानघाट रोड या गावाच्या चारही सीमांवर गुडमॉर्निंग पथकातील कर्मचारी गस्तीवर ठेवण्यात आले. भल्या पहाटे अंधाराचा फायदा घेत अनेक वृद्ध हातात ‘तांब्या’ घेऊन जणू कर्तबगारीवरच निघाल्याचे चित्र या पथकाला दिसले. या पथकाने पुढाकार घेत अनेकांना तांब्यासह वाटेतच अडवून त्यांना शौचालय बांधण्याचे मुलमंत्र दिले. दरम्यान पथकाला सदर तांब्याधारकांनी विनवणी करून शौचास जाण्याची केविलवाणी अवस्था केली. मात्र कर्तव्यावर असलेल्या पथकाने त्यांना समाजजागृतीचा परिपाठ ऐकवीत प्रात:विधी करण्यापासून वंचित ठेवून माघारी परतविले. तर अनेकांनी पथकाला गुंगारा देत रस्त्याच्या कडेवरच कार्य समाप्ती करण्याच्या प्रयत्न केला. यावेळी पथकाने अशा लोटाधारकांना गुलाबाचे पुष्प देऊन त्यांना उघड्यावर शौचास बसण्यास परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. गुडमॉर्निंग पथक गावात दाखल झाल्याने आज भल्या पहाटेपासूनच उमरवाड्यातील ‘गोदरी’वर जाणाऱ्यांची मोठी फजीती केली. या पथकात सरपंच निर्मला टेकाम, उपसरपंच नंदलाल गुर्वे, जिल्हा कक्षाचे मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभणे, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे, पंचायत समितीचे गटसमन्वयक पल्लवी तिडके, समूह समन्वयक हर्षाली ढोके, अनिता कुकडे, शशीकांत घोडीचोर, पौर्णिमा डुंभरे, पडोळे, मोहदुरे, इखार, पोलीस पाटील हरिश्चंद्र गिरडकर, ग्रामपंचायत सदस्य सत्यभामा बोरकर, अनिता तरारे, अमीत टेकाम, गंगाधर शहारे, सचिव सतीश सेलोकर, मनोहर बोरकर, राजेश बोरकर, पोलीस चौकीचे पुडके, ढबाले आदींचा समावेश होता. यावेळी उत्सुकतेपोटी ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)