शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
3
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
4
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
5
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
6
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
7
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
8
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
9
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
10
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
11
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
12
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
13
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
14
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
15
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
16
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
17
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
18
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
19
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
20
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका

गवराळावासीयांनी दिली रंगाला तिलांजली'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 05:00 IST

गावात किसनबाबा अवसरे महाराज यांचे वास्तव्य होते. ते मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील बेलगाव येथील रहिवासी होते. ते व्यवसायाने गवंडी होते. ते गवराळा येथील हनुमान मंदिरात राहत असत. त्यांनी श्रमदानातून या परिसरातील अनेक गावांमध्ये मंदिराचे बांधकाम केले. त्यांचा मितभाषी, मनमिळावू स्वभाव आणि धार्मीक वृत्तीमुळे ते परिसरात सुप्रसिद्ध होते.

ठळक मुद्दे२८ वर्षापासून परंपरा कायम : लाकडांऐवजी केरकचऱ्याची करतात होळी

हरिश्चंद्र कोरे।लोकमत न्यूज नेटवर्कविरली बु.: होळीनंतरचे धुलीवंदन म्हणजे विविध रंगाची उधळण करीत बेधूंद होऊन नाचण्याची आनंददायी पर्वणी. या सणाला संपूर्ण देशात सर्व आबालवृद्ध देहभान विसरुन विविध रंगांनी न्हाऊन निघतात. मात्र लाखांदूर तालुक्यातील गवराळा येथील गावकऱ्यांनी गेल्या २८ वर्षापासून धुलीवंदनाला रंग न खेळण्याची परंपरा जोपासली आहे.या गावात किसनबाबा अवसरे महाराज यांचे वास्तव्य होते. ते मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील बेलगाव येथील रहिवासी होते. ते व्यवसायाने गवंडी होते. ते गवराळा येथील हनुमान मंदिरात राहत असत. त्यांनी श्रमदानातून या परिसरातील अनेक गावांमध्ये मंदिराचे बांधकाम केले. त्यांचा मितभाषी, मनमिळावू स्वभाव आणि धार्मीक वृत्तीमुळे ते परिसरात सुप्रसिद्ध होते. अशा या श्रम प्रतिष्ठेला चालना देणाऱ्या कर्मयोगी किसनबाबांचे १९ मार्च १९९२ रोजी निधन झाले. आपल्या जीवनयात्रेच्या अंतिम दिवशीही त्यांनी मंदिराचे अपूर्ण बांधकाम पूर्ण केले. तो दिवस होळीचा होता. संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला. त्यावेळी शोकमग्न गवराळावासीयांनी होळी साजरी न करण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प अद्याप अबाधित आहे. होळीच्या दिवशी सर्वत्र विविध रंगाची उधळण करीत आचकट विचकट मौजमजा केली जाते. मात्र गवराळा येथे कर्मयोगी किसनबाबा अवसरे महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्रिदिवसीय पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन केले जाते. धुलीवंदनाच्या दिवशी गोपालकाल्याने या महोत्सवाचा समारोप होतो. या कार्यक्रमात गावातील सर्व जातीधर्माचे लोक मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात. अशाप्रकारे येथील ग्रामवासी रासायनिक अथवा नैसर्गिक रंगांएवजी भक्तीरसात न्हाऊन निघतात. पुण्यतिथी महोत्सवात विविध धार्मिक जनजागृतीपर कार्यक्रम, सामूदायीक ध्यान, सामूदायीक प्रार्थना, कीर्तन, भारूड, भजन, दिंडी आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामसफाई करून जमा झालेल्या केरकचºयाची प्रतिकात्मक होळी पेटविली जाते. धुलीवंदनाच्या दिवशी ग्रामगीता तत्वज्ञान, ग्रामसभा, ग्रामस्वराज्य आदी विषयांवर विविध मान्यवर मार्गदर्शन करतात. हा कार्यक्रम ग्रामगीताचार्य तुकारामदादा यांचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संतांच्या सहवासात दरवर्षी साजरा केला जातो.आदर्श परंपरा जोपासण्याची गरजराज्यात सर्व होळी व धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करुन लाकूड जाळले जाते. त्यामुळे प्रदूषण होते. रंगातही लाखो रुपये खर्च होतात. निष्पाप प्राण्यांचे बळी घेतले जातात. त्यामुळे पर्यावरणची हानी होते. गवराळावासीयांनी या सर्व प्रकारांना तिलांजली देऊन आपला एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. या गवराळावासीयांचा आदर्श व परंपरा इतर गावकºयांनी जोपासण्याची गरज आहे.

टॅग्स :Socialसामाजिक