शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

ग्रामपंचायत क्षेत्रात गृहकर वाढणार

By admin | Updated: February 20, 2016 01:26 IST

भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायत असलेल्या गावात यावर्षीपासून प्रथमच नवीन कर आकारणी सुरु होणार आहे.

ग्रामस्थ धास्तावले : ग्रामविकास व जलसंधारण विभागाची अधिसूचनाकोंढा (कोसरा) : भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायत असलेल्या गावात यावर्षीपासून प्रथमच नवीन कर आकारणी सुरु होणार आहे. इमारतीचे भांडवली मूल्य ठरवून कर ठरविले जात आहे. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतीची कर वसुली शुन्य आहे. अशावेळी ग्रामपंचायतीची मार्च अखेर वसुली एक टक्काही झाली नाही. नागरिक मात्र प्रत्येक गावात इमारत कर वाढणार म्हणून धास्तावले आहेत असे चित्र आहे.ग्रामपंचायत असलेल्या क्षेत्रात जागेच्या क्षेत्रफळानुसार गृहकर आकारणी केली जात असे. मात्र या गृहकर आकारणीच्या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. या याचिकेची सुनावणी डिसेंबरमध्ये झाल्यानंतर उच्च न्यायालयाने इमारतीचे भांडवली मुल्य ठरवून कर आकारण्यात यावे, असे आदेश दिले. त्यानुसार शासनाने ३१ डिसेंबरला ग्रामविकास व जलसंधारण विभागाने अधिसूचना काढून इमारती व खाली जागेचे भांडवली मुल्य काढून इमारत कर आकारणी करण्यास सांगितले. जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना त्यानुसार सूचना दिली आणि गटविकास अधिकाऱ्यांनी आपल्या, खंडातील सर्व सरपंच, ग्रामसेवक यांच्या कार्यशाळा घेऊन इमारतीचे कर कसे आकारायचे ते सांगितले. सध्या सर्व ग्रामपंचायतमध्ये सरपंच, ग्रामसेवक व इतर ग्रा.पं. चे कर्मचारी जानेवारी महिन्यापासून नवीन कर आकारण्याच्या कामात व्यस्त आहेत. इमारती किंवा खाली जागेवर कर बसविण्यासाठी राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार होत आहे. कर भरणारा घरमालक, भाडेधारकास कर आकारणी करावयाचे प्रपत्र भरून द्यावे लागणार आहे. धार्मिक प्रयोजनासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या व जेथे प्रार्थना होते. त्यावर कर आकारणी केली जाणार नाही. पण मंदिराला लागून असलेले पुजाऱ्याचे निवासस्थान, कार्यालय व धार्मिक स्थळाचे व्यवसायीक गाळे यांच्यावर कर आकारणी केली जाणार आहे. शाळा, ग्रंथालय, प्रयोगशाळा कार्यालय, क्रीडांगण, वसतिगृह कर्मचारी निवासस्थान उपहारगृह यांच्यावर देखील कर आकारण्यात येणार आहे. संरक्षण दलात शौर्यपदक किंवा सेवापदक धारक माजी सैनिक किंवा माजी सैनिकांची विधवा यांना एका इमारतीवर करातून माफी असणार आहे. पण त्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र त्यांना सादर करावे लागेल.भांडवली मुल्यावर आधारीत कर आकारणी करण्यासाठी प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये कर आकारणी समिती गठीत करण्यात आली आहे. सरपंच अध्यक्ष, उपसरपंच सदस्य, विस्तार अधिकारी (पंचायत) सदस्य, कनिष्ठ अभियंता, जिल्हा परिषद (बांधकाम) आणि सदस्य सचिव ग्रामसेवक किंवा सचिव हे आहेत. ही समिती शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कर आकारणी करून अंतिम यादी तयार करीत आहे. या समितीवर नियंत्रण ठेवणारी तालुकास्तरावर संनियंत्रण समिती गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेत स्थापन केली आहे. हे सर्व कामे सुरु असल्याने सध् या ग्रामपंचायतला एकही घरकर मिळाले नाही. म्हणून ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती डबघाईस आल्या आहेत. वीज, पाणीपुरवठा योजना बिल भरण्यास ग्रामपंचायतकडे एकही निधी नाही. अशावेळी नवीन दराने आकारणी केल्यानंतर नागरिकांना देखील कर आकारणी मान्य होईल का? असा प्रश्न निर्माण होत आहे. पवनी तालुक्यातील चौरास भागातील प्रत्येक गावात नवीन कर आकारणीचा नागरिकांनी धास्ती घेतली आहे. कर दीड, दुपटीने वाढले तर गृहकर कसे भरायचे असा प्रश्न गरीबांना पडला आहे. ज्यांच्याजवळ घर बांधण्यास पैसे नाही. अशांना शासन घरकुल मंजूर करते. आर्थिकदृष्ट्या मागास घरकुलात राहणारे गरीबांना घर कर भरताना मोठी कसरत करावी लागणार आहे. नवीन कर आकारणीमुळे ग्रामीण भागातील नागरिक धास्तावले आहेत. (वार्ताहर)