शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
5
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
6
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
7
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
8
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
9
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
10
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
11
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
12
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
13
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
14
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
15
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
16
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
17
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
18
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
19
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
20
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!

मुरमाडी ग्रामपंचायतीमध्ये भोंगळ कारभार

By admin | Updated: June 1, 2015 01:13 IST

तालुक्यातील मुरमाडी (सावरी) चे सरपंच व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता...

लाखनी : तालुक्यातील मुरमाडी (सावरी) चे सरपंच व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमर्जीने कारभार करतात, असा आरोप ग्रामपंचायत सदस्य नीलेश गाढवे यांनी पत्रपरिषदेतून केला आहे.ग्रामपंचायतीमधील बारमाही सफाई कामगारांना सिमेंट काँक्रीट रस्त्याचे कामावर आढळून आले आहेत. सदर कर्मचारी नाल्याची सफाई तसेच कचरागाडीने कचरा गोळा करून कचऱ्याची विल्हेवाट लावत असतात. परंतु ग्रामपंचायत ठेकेदारी करीत असून नालीबांधकाम व सिमेंट रस्त्यावर सफाई कामगारांना पाठविण्यात येत असते असा आरोप गाढवे यांनी केला आहे. यामुळे गावातील नाल्या साफ होत नाही. मुरमाडी ग्रामपंचायतीने घरटॅक्स वाढविला आहे. त्या तुलनेत गावातील लोकांना सुविधा देण्यात येत नाही. ग्रामपंचायतला मागील दोन वर्षापासून शौचालय यादीचे अर्ज मिळाले आहेत. परंतु अद्यापही एकही शौचालय तयार करून देण्यात आले नाही. घरकूल मिळावा यासाठी ग्रामपंचायतला अर्ज निवेदन दिले आहे. परंतु २०१४-१५ मध्ये एकही घरकूल देण्यात आले नाही. मग्रारोहयोच्या माध्यमातून गाईचे गोठे बांधण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. परंतु ही योजना राबविण्यास ग्रामविकास अधिकारी व सरपंच अपयशी ठरले आहेत. वार्ड क्र. ५ मध्ये ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा साखरे यांनी सिमेंट रस्त्याची दोन वर्षापासून मागणी केली आहे. परंतु रस्ता तयार करण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नीलेश गाढवे यांनी केला आहे. मासिक सभेला सरपंच निर्धारित वेळेपेक्षा उशिरा येत असतात. ग्रामविकास अधिकारी पाटे शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येत नाही. ग्रामपंचायतच्या कामावर ग्रामविकास अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने पाटे यांना निलंबित करण्याची मागणी गाढवे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)