शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपासून निधी मंजूर, तरीही बांधकामाचा मुहूर्त नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 12:57 IST

लाखनी ग्रामीण रुग्णालयातील प्रकार : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : येथील ग्रामीण रुग्णालयातील औषधी भांडार कक्षासाठी २०१९ मध्ये ३६ लाख रुपयांचे बांधकाम मंजूर करण्यात आले होते. मात्र, पाच वर्षांचा कालावधी उलटूनही या कक्षाच्या बांधकामाचा अजूनपर्यंत पत्ता नाही. त्यामुळे औषधी न भांडार कक्षाचे बांधकाम होणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या जागेत हे बांधकाम होणार आहे, तिथे खड्डे मात्र खोदून आहेत.

या तालुक्याची निर्मिती झाल्यापासून येथे असलेल्या रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. येथे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र केसलवाडा येथे स्थानांतरित करण्यात आले. मात्र ग्रामीण रुग्णालयात सोयी व सुविधांचा अजूनही अभाव आहे. येथे ग्रामीण रुग्णालयाची प्रशस्त इमारत तर आहे, मात्र औषधी भांडार कक्ष नाही. परिणामतः औषधांचा साठा वॉर्डात करावा लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन औषधी भांडार कक्षाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. लाखनी हे तालुक्याचे ठिकाण असून, तालुक्यातील नागरिक दैनंदिन कामासाठी व औषधोपचारासाठी दाखल होतात. मात्र, नागरिकांना योग्य त्या सोयी रुग्णालय प्रशासनाकडून मिळत नाहीत. परिणामतः नागरिकांना खासगी रुग्णालयाचा मार्ग स्वीकारावा लागतो. खासगी रुग्णालयाची सेवा गरिबांच्या खिशाला परवडणारी नाही. येथे ग्रामीण रुग्णालय तर आहे, परंतु तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे नागरिकांना रेफर टू भंडारा केले जाते.

वाढीव प्रसूतिगृहाचे बांधकाम सदोषरुग्णालयातील वाढीव प्रसूतिगृहाच्या बांधकामावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र, इमारतीला गळती होत असल्यामुळे बांधकाम सदोष असल्याचे दिसून येत आहे. कंत्राटदाराने साहित्याचा अत्यल्प वापर केल्यामुळे हे बांधकाम सदोषआहे, असे बांधकाम क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. सदोष बांधकाम करणारे कंत्राटदार, त्यावर देखरेख करणारे अभियंते यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

३० खाटांचे रुग्णालय २० खाटांवरया ग्रामीण रुग्णालयाला ३० खाटांची परवानगी आहे. असे असले तरी सध्या एका वॉर्डात औषधी ठेवण्यात आल्यामुळे २० खाटा कार्यान्वित आहेत. त्यामध्ये एक जनरल वॉर्ड व दुसरे महिलांकरिता वॉर्ड ठेवण्यात आले आहेत.

ग्रामीण रुग्णालयात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे बांधकामलाखनी येथील पंचायत समिती कार्यालयात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आहे. ते अपुऱ्या जागेत असल्याने ग्रामीण रुग्णालय परिसरात नव्याने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बांधकाम जोमात सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात हे बांधकाम करू नये, असा पत्रव्यवहार येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी कार्यकारी अभियंता तसेच वरिष्ठांना केला होता. मात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्या पत्राला केराची टोपी दाखविली. परिणामतः काम सुरूच आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा