शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

ग्रामसेविकेला डांबले !

By admin | Updated: August 22, 2015 00:56 IST

ग्रामसभा सुरु असताना एका ग्रामस्थाने ग्रामसेविकेला अश्लिल शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत त्यांना ....

बोरगाव येथील प्रकार : अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकीभंडारा : ग्रामसभा सुरु असताना एका ग्रामस्थाने ग्रामसेविकेला अश्लिल शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत त्यांना ग्रामपंचायतीमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लाखनी तालुक्यातील बोरगाव येथे घडला. याप्रकरणी ग्रामसेवक संघटनेने काळया फिती लावून निषेध केला. लाखनी तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामसेविका एल. बी. जनबंधू व सरपंचांच्या उपस्थितीत सुरु होती. दरम्यान ग्रामस्थ देवानंद उके हे ग्रामसभेत आले. यावेळी त्यांनी ग्रामसेविका जनबंधू यांना अश्लिल शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावर न थांबता त्याने त्यांना ग्रामपंचायतीमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला. यावेळी सरपंचासह उपस्थित ग्रामस्थांनी समयसुचकता दाखविल्याने अनर्थ टळला. दरम्यान अचानक घडलेल्या या प्रकाराने ग्रामसेविका चांगलीच धास्तावली. याची तक्रार खंड विकास अधिकारी कार्यालयाला केली. मात्र, कार्यालयाकडून कुठलिही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामसेवक संघटनेने केला आहे. याप्रकरणी ग्रामसेविका जनबंधू यांनी देवानंद उके यांच्याविरूध्द दिलेल्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी गुन्हा नोंदवून उकेला अटक केली. मात्र, या प्रकारामुळे ग्रामसेवकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून भविष्यात उके यांच्याकडून सूड भावनेतून पाऊल उचलण्याची भीती वर्तविली आहे. ग्रामसभेला पर्यवेक्षकांची नेमणूक करावी, अशा प्रकारावर आळा बसावा यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, असे निवेदन खंडविकास अधिकाऱ्याांना देण्यात आले आहे. शिष्टमंडळात जयंत गडपायले, नरेश शिवणकर, जहिर पटेल, राहूल ठवकर आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)