शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

वधूच्या खात्यात जमा होणार अनुदान

By admin | Updated: December 20, 2014 22:34 IST

बोगस सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून अनुदान लाटण्याचा गोरखधंदा तालुक्यासह परिसरात मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. हा गोरखधंदा आता बंद होणार असून, सामूहिक विवाह

शासन निर्णय : खऱ्या लाभार्थ्यांना मिळणार अनुदान, गोरखधंद्याला बसणार आळाभंडारा : बोगस सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून अनुदान लाटण्याचा गोरखधंदा तालुक्यासह परिसरात मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. हा गोरखधंदा आता बंद होणार असून, सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करणाऱ्या वधू-वरांना शासनाकडून मिळणारे १० हजार रूपयांचे अनुदान थेट वधूंच्या बँक खात्यात जमा होणार आहे.सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती यामुळे गोरगरीब सर्वसामान्यांना आपल्या पाल्यांचे लग्न लावून देण्यास आर्थिक अडचण येत असते. आर्थिक बाजू कमकुवत असल्याने आपल्या पाल्यांसाठी पाहिजे असे चांगले स्थळ मिळत नसते. अशा गोरगरिबांच्या मुलामुलींच्या लग्नासाठी शासनाने १० हजार रूपये मदत जाहीर केली, अशी ही योजना आहे. या सयोजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून या सोहळ्यामध्ये लग्न करणाऱ्या जोडप्यांना १० हजार रूपये शासनाकडून अनुदान म्हणून मिळायचे. सदर अनुदान प्रत्यक्षरित्या त्या जोडप्यांना न देता सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या संस्थेला देण्यात येत होते. ज्या जोडप्यांचे अगोदरच लग्न होवून ज्यांना अपत्य झाली, अशी जोडपीही विवाह सोहळ्यात पुन्हा लग्न लावून घ्यायची. तसेच शासनाच्या अनुदान लाटत असे. विविध संस्था असे बोगस सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाची लूट करायचे. यामुळे खरे लाभार्थी अनुदानापासून वंचित राहत असत. त्यामुळे शासनाने सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या वधू-वरांना १० हजार रूपये अनुदान थेट वधूच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेत आहे. (नगर प्रतिनिधी)