शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

सहकारी संस्थाकडे सरकारचे दुर्लक्ष

By admin | Updated: November 11, 2014 22:35 IST

अत्यल्प कमिशनवर धान खरेदी केंद्र चालवुन केदं्र व राज्य शासनाला सहकार्य करणाऱ्या तालुका स्तरीय खरेदीविक्री सहकारी संस्था अत्याधिक डबघाईस आल्या असून या पुर्वीच्या

साकोली : अत्यल्प कमिशनवर धान खरेदी केंद्र चालवुन केदं्र व राज्य शासनाला सहकार्य करणाऱ्या तालुका स्तरीय खरेदीविक्री सहकारी संस्था अत्याधिक डबघाईस आल्या असून या पुर्वीच्या आघाडी सरकारने या संस्थाचे अस्तीत्व धोक्यात आणले आहे. हे आता स्पष्टपणे उघड झाले आहे. वर्ष २००९ पासुन शासनाने सहकारी संस्थाना त्यांचे कमीशन, गोदाम भाडे, हमाली खर्च तसेच सहित्याची रक्कम अदा केली नाही. त्यामुळे या संस्थाच बंद होण्याच्या मार्गावर असून यावर्षी साकोली तालुक्यात धान खरेदी करणार नाही अशी भुमिका श्रीराम सहकारी भातगिरनी साकोली यांनी घेतली आहे. त्यामुळे शासनाच्या जांचक अटीचा त्रास शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.केंद्र सरकारची आधारभूत खरेदी केंद्राची योजना राज्य शासनामार्फत पणन महामंडळाच्या वतीने कार्यान्वित केली जाते. पणन महामंडळाकडे स्वत:ची यंत्रणा नसल्याने तालुका खरेदीविक्री सहकारी संस्थाच्या मदतीने खरेदी केंद्र कार्यान्वित केली जाते. यासाठी संस्थाना २ टक्के कमीशन, गोदाम भाडे, हमाली खर्च व इतर साहित्याचा खर्च देण्याची तरतुद आहे. खरेदी केंद्र चालविणाऱ्या या संस्थेकडे पुरेसे गोदाम नसल्याने ते खाजगी गोदाम भाड्याने घेतात. दरम्यान मागील पाच वर्षापासुन राज्यशासनाने संस्थाचे कमीशन, गोदाम भाडे आणि अन्य रक्कमेचे चुकारेच देण्यात आली नाही उलट साठवून ठेवण्यात आलेल्या धानात तुट आल्याचे कारण पुढे करीत संस्थाकडून मोठी कपात करण्यात येते.यासंदर्भात श्रीराम सहकारी भातगिरणी सहकारी संस्था साकोली येथे चौकशी केली असता. मिळालेल्या माहितीनुसार या संस्थेने सन २००९-१० ला ६२ हजार ९४६ क्विंटल, सन २०१०-११ ला २७ हजार ८१ क्विंटल, सन २०११-१२ ला ६० हजार १०६ क्विंटल, सन २०१२-१३ ला ६१ हजार ७३० क्विंटल, सन २०१३-१४ ला ३३ हजार ९६६ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. या धान खरेदीसाठी शासनाने शेतकऱ्यांना १९ कोटी ३८ लाख ४ हजार २५८ रुपये दिले.धान खरेदी नंतर शासनाने हा धान दोन महिन्यात तर उचल करावा. मात्र शासनातर्फे हा धान दोनदोन वर्ष उचलच करण्यात आल नाही. परिणामी धानात कमालीची घट आली. यानंतर सन २००९-१० पासुनचे या संस्थेचे आतापर्यंत कमीशनची एकुण रक्कम ही ४१ लक्ष रुपये एवढी झाली पैकी शासनाने त्यांना फक्त ४ लक्ष रुपये दीले असून गोडाऊन भाडे जवळपास २० लक्ष रुपये एवढे झाले मात्र शासनाने ही रक्कम अजुनपर्यंत अदा केली नसल्यामुळे यावर्षी ही संस्था धान खरेदी करण्यास तयार नाही. जोपर्यंत धान खरेदी केंद्र सुरु करणार नाही अशी भुमिका या संस्थेने घेतली आहे. शासनाच्या या कढोरपनाचा त्रास मात्र शेतकऱ्यांना भोगावा लागत असून शेतकरी आपला धान खाजगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात विकत आहेत. (तालुका प्रतिनिधी)