शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे दूध धोरण दुग्धउत्पादकांना मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:57 IST

शासनाने आधी ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी दरात संघाकडून दूध खरेदी करीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे.

ठळक मुद्देसंचालकांचा आरोप : दुधाचे दर कमी, दुग्ध संघाने जपले शेतकऱ्यांचे हित

आॅनलाईन लोकमतपालांदूर (चौ.) : शासनाने आधी ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी दरात संघाकडून दूध खरेदी करीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे. प्रति लिटर २ ते ३ रुपये एरव्ही नुकसान शेतकऱ्यांना सहन करावी लागत आहे. यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला पुन्हा आर्थिक संकटात ओढवल्याचा आरोप दुग्ध संघाचे संचालक विनायक बुरडे यांनी केला.जेवनाळा येथील जयदुर्गा दुग्ध डेअरीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, शासनाने ठरविलेल्या गाईच्या दुधाला २६ रूपये एवढा दर असताना संघाकडून २ ते ३ रूपये एवढा कमी दराने शासनाने दुध खरेदी केला आहे. यामुळे संघ अडचणीत आला असून त्याचा परिणाम शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.जिल्ह्यात दुग्धसंघाच्यावतीने शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न होत आहे. गुजरातच्या धर्तीवर जिल्ह्यात ३०० डेअरीत यंत्र बसवून शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक थांबविली आहे. शेतकऱ्याला त्याच्या दुधाचा दर्जावरुन भाव निश्चीत करुन एका दिवसाला त्याला किती रुपये दुधाचे झाले याचा हिशोब मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे. भंडारा जिल्ह्यातील संघाचा शेतकरी खासगीत दुग्ध विकणाऱ्यापेक्षा फायदेशीर असल्याचा दावा सुध्दा विनायक बुरडे यांनी यावेळी केला.धानाच्या शेतीबाबत सरकार उदासीनसरकारला धानाच्या शेतीबाबत धोरण ठरविता आले नाही. तुडतुड्याने अख्खे शेत फस्त करुनही सर्वेक्षण झाले नाही. पाणी कमी पडूनही उत्पन्नाला तुट दिसत असूनही आणेवारी अधिक दाखवित असल्याचा आरोप बुरडे यांनी केला. लाखनी तालुक्यात दुधक्रांतीमुळे ८० टक्के घरात दैनंदिन खर्च निभत आहे. भंडारा जिल्हा दूध संघाच्या धोरणात्मक निर्णयामुळे खासगी दुध व्यापारी मागे पडले आहेत. यावर तोडगा काढण्याची गरज आहे.