शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शासन सदैव तत्पर

By admin | Updated: September 18, 2016 00:32 IST

नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी केंद्र व राज्य शासन तत्पर असून यापुढेही आरोग्याच्या सुविधा मोठया प्रमाणात देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे...

चरण वाघमारे : नागरिकांनी घेतला आरोग्यसेवेचा लाभ, आरोग्य शिबिरात दिव्यांगांना साहित्याचे वाटपतुमसर : नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी केंद्र व राज्य शासन तत्पर असून यापुढेही आरोग्याच्या सुविधा मोठया प्रमाणात देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले. तुमसर येथे आयोजित महाआरोग्य शिबीराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार चरण वाघमारे यांच्या पुढाकाराने आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व समाजसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तुमसर येथे आयोजित महाआरोग्य शिबिरात हजारो नागरिकांनी रूग्णसेवेचा लाभ घेतला. या शिबिराचे उदघाटन १२१ वर्षी वयोवृध्द तुळसाबाई मालघटी व १०८ वर्षीय इकाराम शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश शेट्ये, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, तुमसरच्या सभापती कविता बनकर, मोहाडीच्या सभापती हरिश्चंद्र बंधाटे, माजी खासदार शिशुपाल पटले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके, तहसिलदार डी. टी. सोनवाने, देशमुख, तारिक कुरेशी, संजय कारेमोरे उपस्थित होते. यावेळी आ.वाघमारे म्हणाले, समाजातील आर्थिकदृष्टया मागास व दुर्बल घटक कुटूंबातील आजारी रूग्ण त्यांना असणाऱ्या गंभीर आजारावर औषधोपचार तथा डॉक्टरांचा सल्ला व नंतर महागडी शस्त्रक्रिया करुन घेण्यास असमर्थ असतात. अशा नागरिकांसाठी तपासणी ते संपूर्ण उपचार या हेतुने हे शिबिर आयोजित केले. रूग्णांची सेवा करा, गरिबांची सेवा करा तसेच गरिबांना मदत करा हा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यालाच अनुसरुन आजचे शिबिर घेण्यात आले. विदर्भात अशा शिबिरांची मालिका सुरू करण्यासाठी शासन पुढाकार घेणार असून त्याची सुरूवात तुमसर येथून होत असल्याचे त्यांनी सांगितले. ३ सप्टेंबर रोजी नोंदणी केलेल्या सर्वांना साहित्याचा लाभ देण्यात येणार आहे. ज्यांना याठिकाणी साहित्य मिळणार नाही, त्यांनाही साहित्य पुरविण्यात येईल. त्यासाठी वाटप शिबिर घेण्यात येईल.यावेळी ओमप्रकाश शेट्ये म्हणाले, एकही बालक कुपोषित राहता कामा नये, असा शासनाचा निर्धार आहे. या शिबीरात नोंदणी केलेल्या प्रत्येक व्यक्तीला साहित्य मिळणार असून त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून निधी देण्यात येईल. पैशाअभावी उपचार थांबणार नाहीत याची काळजी मुख्यमंत्री स्वत: घेतात. हे शिबिर दिव्यांग व्यक्तीसाठी योग्य संधी असून येथील मिळणाऱ्या साहित्याचा योग्य उपयोग करण्याचा सल्ला त्यांनी दिला. या शिबिरात कर्णबधीरांना कर्णयंत्राचे वाटप करण्यात आले. संचालन डॉ. शांतीदास लुंगे यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी केले. या शिबिरात आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी रूग्णसेवा दिली. (तालुका प्रतिनिधी)तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने केली रूग्णांची तपासणीया महाआरोग्य शिबिरात जे. जे. हास्पिटल मुंबई, वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, मेयो हॉस्पिटल नागपूर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था सावंगी मेघे, लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर, सामान्य रुग्णालय भंडारा, सुभाषचंद्र उपजिल्हा रुग्णालय तुमसर, ग्रामीण रुग्णालय सिहोरा- मोहाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आदि ठिकाणच्या तज्ञ डॉक्टंरांच्या टिमद्वारे रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात आले.दिव्यांगांना साहित्यांचे वाटपया शिबिरात हृदय रोग, मधुमेह, दंतरोग, कान, नाक, घसा, दमा, विविध आजार, डोळयांचा तेळेपणा, कृत्रिम अवयव, मोतीबिंदु, जनलर सर्जरी, स्त्रिरोग, प्रसुती रोग, किडनीचे आजार, कर्करोग, मुळव्याध, भगंदर, आयुर्वेदिक उपचार, आयुष, युनानी, विविध तपासणी, दिव्यांगांना कुबड्या, तीनचाकी सायकल, व्हिलचेअर, श्रवणयंत्रांचा लाभ देण्यात आला.