शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोसेचे बॅकवॉटर शेतात, तीन वर्षांपासून मोबदला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2022 20:41 IST

दवडीपार गाव गोसेच्या बुडीत क्षेत्रालगत आहे. गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती प्रकल्पात गेली, तर अनेक शेतकऱ्यांची बुडीत क्षेत्रालगत शेती आहे. बॅकवॉटर कोठपर्यंत येणार याचे सीमांकन करण्यात आले होते. शेतापासून सीमांकनाचा दगड दूर असल्याने शेतकरी धानाची बिनधास्त रोवणी करतात. मात्र गत तीन वर्षांपासून ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात प्रकल्पाची पाणी पातळी वाढली की दवडीपार येथील शेतात पाणी शिरते. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बुडीत क्षेत्राबाहेरील शेतात गोसेचे बॅकवॉटर शिरत असून, काढणीला आलेला धान शेतातच सडत आहे. तीन वर्षांपासून हा प्रकार भंडारा तालुक्यातील दवडीपार येथे सुरू आहे. २० शेतकऱ्यांच्या सुमारे ६० एकरात पाणीच पाणी असते. मात्र, या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. यात प्रत्येक शेतकऱ्याचे ४० ते ५० हजारांचे नुकसान होत आहे. पाणी पातळीच्या चुकीच्या सर्वेक्षणाचा फटका या शेतकऱ्यांना बसत आहे. दवडीपार गाव गोसेच्या बुडीत क्षेत्रालगत आहे. गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती प्रकल्पात गेली, तर अनेक शेतकऱ्यांची बुडीत क्षेत्रालगत शेती आहे. बॅकवॉटर कोठपर्यंत येणार याचे सीमांकन करण्यात आले होते. शेतापासून सीमांकनाचा दगड दूर असल्याने शेतकरी धानाची बिनधास्त रोवणी करतात. मात्र गत तीन वर्षांपासून ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात प्रकल्पाची पाणी पातळी वाढली की दवडीपार येथील शेतात पाणी शिरते. आता धान कापणीला आला आहे. मात्र, शेतात दोन ते तीन फूट पाणी आहे. शेतात जाणेही कठीण आहे. धान जागेवरच सडू देण्याशिवाय पर्याय नाही.  यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

सांगा शेतात कसे जायचे?- शेताच्या चहूबाजूने बॅकवाटर आहे. धानाच्या बांधितही पाणीच पाणी आहे. परिसरात धान कापणी जोमात सुरू आहे. आमच्या शेतात धान सडत आहे. यावर्षी पाणी शिरणार नाही असे समजून आशेने लागवड करतो; पण ऐन हंगामात पाणी शिरते. आता धान कापणीसाठी शेतात जायचे कसे, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.

डोळ्यांदेखत धान सडतो पाण्यातगोसेच पाणी शिरले की, बांधित सतत पाणी राहते. त्यामुळे धान भरत नाही. सततच्या पाण्याने धान जागेवरच सडते, असे शेतकरी सांगतात. रामकृष्ण वाढ, खुशाल सेलाेकर, गजानन सेलोकर, पांडुरंग कुथे, देवराव कुथे, गंगाधर ठवकर, अशोक वैद्य, जगदीश ठवकर यांच्यासह सुमारे २० शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. मोबदला मिळावा म्हणून गोसे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसह प्रशासनाला निवेदन दिले आहे. मात्र, अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही.

मोठा खर्च करून धानाची राेवणी करतो, मात्र बॅकवॉटर शेतात शिरते आणि मोठे नुकसान होते. तीन वर्षांपासून धान पिकाचे नुकसान होत आहे. मात्र शासनाने एकदाही मदत दिली नाही. चुकीच्या सर्वेक्षणाचा आम्हा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शासनाने तातडीने मदत द्यावी.रामकृष्ण वाठ, शेतकरी, दवडीपार

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पagricultureशेती