शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणूक; पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसची आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 10:44 IST

भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांनी १८,०२८ मतांची आघाडी घेतली आहे.

ठळक मुद्देभाजपा दुय्यम स्थानावर तर अन्य पक्ष जेमतेम स्थितीत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा- भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांनी १८,०२८ मतांची आघाडी घेतली आहे. तर भाजपचे हेमंत पटले यांना १७, २४६ मते मिळाली आहेत. हाती आलेल्या बातम्यांनुसार दुसऱ्या व तिसऱ्या फेरीतही राष्ट्रवादी पुढे असून सध्या चौथ्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.पहिल्या फेरीतील मतमोजणीत अक्षय पांडे १९५ (विदर्भ माझा पार्टी), गोपाल उईके १५० (गोंडवाना गणतंत्र पार्टी), डॉ.चंद्रमणी कांबळे- १०१ (आंबेडकर पार्टी आॅफ इंडिया), जितेंद्र राऊत- ५४ (अखिल भारतीय मानवता पार्टी), धरमराज भलावी- १३९ (बहुजन मुक्ती पार्टी), नंदलाल काडगाये- १२० (बळीराजा पार्टी), राजेश बोरकर-११९ (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), एल.के.मडावी-७७८ (भारिप बहुजन महासंघ), अजबलाल तुलाराम- ३३३ (अपक्ष), किशोर पंचभाई- ४९ (अपक्ष), काशीराम गजबे- ४४५ (अपक्ष), चनीराम मेश्राम- ६८ (अपक्ष), पुरुषोत्तम कावळे- १४२ (अपक्ष), राकेश टेभरे- ३२९ (अपक्ष), रामविलास मस्करे- ४४८ (अपक्ष), सुहास फुंडे-. ३५६ (अपक्ष) अशी मते पडली आहेत.गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे दि. २८ मे रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. नाना पटोले यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यावर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. दरम्यान, ईव्हीएममधील बिघाडामुळे बुधवारी (३0 मे) भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील ४९ बुथवर फेरमतदान घेण्यात आले. यावेळेस, गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले, असा ठपका ठेऊन त्यांची ताबडतोब बदली करण्यात यावी, असेही आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने काळे यांची लगेच बदलीही केली. मात्र, काळे यांच्याकडून कर्तव्यात काय कसूर झाली, हे मात्र आयोगानं स्पष्ट केलेले नाही. 

टॅग्स :Bhandara-Gondia Lok Sabha Bypoll 2018भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक 2018