शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

 दुपारच्या सुट्टीत तलावावर जाणे जीवावर बेतले; विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2022 19:23 IST

Bhandara News पाय घसरून पडल्याने विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना तुमसर शहराजवळील हसारा येथे मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

भंडारा : पाय घसरून पडल्याने विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना तुमसर शहराजवळील हसारा येथे मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. दुपारच्या सुट्टीत मित्रांसोबत तलावावर गेला असता पाळीवरून पाय घसरून तो तलावात पडला.

देवेंद्र अजय बोंद्रे (१२) रा. हसारा, ता. तुमसर असे मृताचे नाव आहे. तो हसरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाचव्या वर्गात शिकत होता. मंगळवारी तो शाळेत गेला होता. दुपारच्या सुट्टीत जेवणानंतर तो मित्रांसोबत तलावाच्या पाळीवर खेळायला गेला होता. खेळताना त्याचा तलावाच्या पाळीवरून पाय घसरला आणि तलावात पडला. त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड केली. त्यामुळे गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. काही वेळात त्याला गावकऱ्यांनी बाहेर काढून तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी आणले. मात्र डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

देवेंद्रच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. देवेंद्रचा परिवार मूळ मोहाडी तालुक्यातील निलज येथील रहिवासी असून तो आईवडिलांसह मामाच्या गावी वास्तव्याला आले होते. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून तुमसर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली.

टॅग्स :Deathमृत्यू