शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
9
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
10
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
11
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
12
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
13
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
14
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
15
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
16
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
17
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
18
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
19
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
20
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?

देवा ! पाऊस पडू दे, रोगराई टळू दे...

By admin | Updated: August 1, 2015 00:12 IST

देवा गावचं भलं कर, पाऊस पाड, गावातली रोगराई दूर कर तसेच गावात एकोपा शांती नांदू दे,

आषाढी पौर्णिमा : गावाच्या शांतीसाठी होते मोहगावदेवीत गावपूजन, पुरातन परंपरा आजही कायमराजू बांते  मोहाडीदेवा गावचं भलं कर, पाऊस पाड, गावातली रोगराई दूर कर तसेच गावात एकोपा शांती नांदू दे, अशी आराधना करण्यासाठी गावातील विविध देवांपूढे मोहगाव (देवी) येथील गावकरी एकत्र येवून गावपूजा केली. अशा गावपूजेची संस्कृती जपण्याचे कार्य परंपरेने पूरातन काळापासून सुरु आहे.शक्तीमातेचे मंदिर असलेले मोहगाव (देवी) हे गाव प्रसिध्द आहे. चार हजार एवढ्या लोकसंख्येचं हे गाव आहे. या गावात मागील काही पिढ्यांपासून गावातील व गाव शेजारील असलेल्या मारुती मंदिर, मातामाय, दैतराजा, बलकीदे, नागठाणा, मशासूर, सुरनदी आदींची गावकरी एकत्र येवून गावपूजा दरवर्षी आषाढी पौर्णिमेला करतात. गावात एकोपा नांदावा, शांती राहावी, गावातली रोगराई नष्ट व्हावी, पाऊस पडावा यासाठी विविध मंदिरात जावून पूजा आरती करतात. गाव पूजेचा सन्मान गावातील सरपंचांना असतो. तसेच गावातील ग्रामपंचायतीची सदस्य मंडळी, वृध्दमंडळी गावपूजेसाठी एकत्र येतो. पूरातन काळापासून ते सात-आठ वर्ष सोडली तर दैतराजा, बल्कीदेव, मशासूर व नदीच्या वाहत्या पात्रात बकरे किंवा अन्य पशूंची बळी देण्याची प्रथा मोहगाव देवी गावात सुरु होती. गावपूजेसाठी वर्गणी गोळा केली जात होती. त्या वर्गणीतून पूजा साहित्य व बकऱ्या कोंबड्यांची खरेदी केली जायची. गावपूजा झाल्यावर कधी सामूहिक तर कधी तर भाजी नेवून गाव जेवण करण्याची परंपरा होती. रुढी, परंपरेचं बर-वाईट गावातील प्रतिष्ठित समजू लागले.सात आठ वर्षापुर्वी सरपंच राहिलेले स्वर्गीय कुंडलिक लेंडे यांनी देवाच्या नावावर समुहाने होणारी पशुहत्या बंद केली. ती बंदी आजही कायम आहे. तथापी, आजही काही गावकरी निष्ठेने वैयक्तिकपणे बकरे कोंबडे दैतराजा या देवाला बळी देतात. विशेषत: मोहगाव (देवी) येथून नवख्या मुली लग्न होवून सासरी जातात. त्या मुलींचे पती (गावजवाई) मोहगाव (देवी) येथे आषाढी पौर्णिमेला येवून दैतराजा देवावर नारळ फोडतात. काही जावई कोबंड्याचा बळी देतात.मोहगाव (देवी) या गावाला टोली आहे. त्या टोलीवर मोहगाव देवी वासींयाच श्रध्दास्थान गणेशपूरी आहे. या गणेशपूरीवर पूर्वी यात्रा भराची. दिंडी, भजन, पूजन होत असे. मोहगाव (टोली) वरील प्रभूजी शहारे सांगतात, चाळीस-पंचेचाळीस वर्षापूर्वी गावात रोगराईने थैमान घातले होते. रोगाने सारेच गावकरी त्रस्त झाले होते. काय कराव गावकऱ्यांना समजेना. गावातील प्रमुखांनी नागपूर स्थित असलेले महाराज गणेशाम नंदपूरी यांचेकडे जायचे. त्यांच्याकडून गावात शांतीयज्ञ करायच असं ठरल. ठरल्याप्रमाणे गणेशपूरी वर यज्ञ करण्यात आले. गाव पूर्ववत शांत झाला. गावातील रोगराई पळाली. तेव्हापासून गावात रोगराई आली नाही. गावात एकोपा व शांती आहे. त्यामुळे मोहगाव (टोली)वर असलेल्या गणेशपूरीवर आषाढी पौर्णिमेच्या दिवशी श्रध्देने गावकरी पूजा करतात.आजही पंरपरागत असलेली गावपूजा मोहगाव देवी येथे आषाएी पौर्णिमेला सकाळपासून गावातील व गावच्या सीमेवरील सर्व देवांची सामूहिक पूजा केली जाते. मारुती मंदिरात सरपंच राजेश लेंडे यांनी गावाच्यावतीने पूजा अर्चा केली. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते. पशुहत्या ही प्रथा बंद झाल्याने गावातील जनतेला प्रसाद देण्यासाठी शिरा केला गेला. पावसान दडी मारली आहे. यासाठी मोहगावदेवी वासियांनी वरुणराजाला आर्त हाक दिली. देवा पाऊस पाड, पीक भरघोष येवू दे.