शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
4
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
5
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
6
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
7
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
8
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
9
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
10
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
11
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
12
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
13
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
14
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
15
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
16
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
17
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
18
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
19
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
20
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला

धानाला क्विंटलमागे ३ हजार रुपये भाव द्या

By admin | Updated: November 5, 2016 00:40 IST

ज्या बळीराजाच्या भरोश्यावर लाखो जीव जगतात त्याच बळीराजाला जगण्यासाठी संघर्ष करावे लागत आहे.

राजेंद्र पटले यांची मागणी : कृषी मुल्य आयोगाचेही अक्षम्य दुर्लक्षभंडारा : ज्या बळीराजाच्या भरोश्यावर लाखो जीव जगतात त्याच बळीराजाला जगण्यासाठी संघर्ष करावे लागत आहे. शेतात राबराब राबूनही हाडामासाचे जीव जोपासण्यासाठी रक्ताचे पाणी होत आहे. शेतकरी आत्महत्या करीत असला तरी शासन व प्रशासन धानाला हमी भाव देण्याच्या मनस्थितीत नाही. प्रती क्विंटल मागे धानाला तीन हजार रुपये भाव द्यावा अशी पुरजोर मागणी किसान गर्जनाचे संस्थापक तथा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी केली आहे.भंडारा व गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. भंडारा जिल्ह्यातील बासमती या भातपिकाच्या प्रजातीला विदेशातही चांगली मागणी आहे. परंतु शासनाचे धोरण व ब्रिटीशकालीन पध्दती यामुळे बळीराजा भरडला जात आहे. जीवघेणी आणेवारी पध्दत व मडाईपेक्षा घडाई जास्त अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. यात विशेषत: अल्पभूधारक शेतकरी संघर्षाच्या स्थितीत येवून पोहचला आहे. वारंवार विनंती करुनही शासनाने धानाला योग्य भाव किंवा हमी भाव जाहिर केलेला नाही. उत्पन्नापेक्षा शेतीत लागणारा पैसा जास्त असल्याने धान शेती करावी की नाही? असा बिकट प्रश्न बळीराजासमोर आजघडीला उपस्थित होत आहे.यासंदर्भात किसान गर्जनाचे संस्थापक राजेंद्र पटले यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत धानाला दर क्विंटलमागे ३ हजार रुपये हमी भाव मिळावा यासाठी संघर्ष केला आहे. आजही त्यासाठी प्रयत्न सुरु आहे. याबद्दल राजेंद्र पटले म्हणाले शासन दरवर्षी जिल्ह्यात विविध ठिकाणी हमी भाव धान खरेदी केंद्र सुरु करते. मात्र सहकारी शेतकरी खरेदीविक्री केंद्र सुरु केले पाहिजे. विशेषत: तुमसर व मोहाडी क्षेत्रात या खरेदीविक्री केद्रांची नितांत आवश्यकता आहे. गोदामामध्ये धान साठवणूक करण्याची क्षमता नसल्याने किंवा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा क्रमांक (नंबर) लागत नसल्यामुळे शेतकऱ्यांना बहूमुल्य धान पडत्या दराने व्यापाऱ्यांना विकावा लागतो. ही खरी शोकांतिका आहे, असेही पटले यांचे म्हणणे आहे.दुसरीकडे धान विकल्यावर शेतकऱ्यांना वेळेवर कधीच चुकारे दिले जात नाही. विशेषत: दिवाळीच्या तोंडावर धान खरेदीकेंद्र सुरु केले जाते. परिणामी दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या हातात रोखरक्कम मिळत नाही. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा व वेतन मिळत नसताना शासन या गंभीर समस्येकडे मागील पाच दशकांपासून दुर्लक्ष का करीत आहे. हा खरा सवाल आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, कृषीमूल्य आयोगाचे दुर्लक्ष यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे. धानाला प्रति क्विंटल ३ हजार रुपये भाव देण्यात यावा अन्यथा शिवसेना पध्दतीने आंदोलन उभारण्यात येईल. असा खणखणीत इशाराही राजेंद्र पटले यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)