शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

By admin | Updated: April 16, 2017 00:14 IST

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी मुलामुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न व शेतीचा विकास करू शकत नाही.

उन्हातही शेतकरी सहभागी : आझाद शेतकरी संघटनेचा पवनीत बैलबंडी मोर्चापवनी : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी मुलामुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न व शेतीचा विकास करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी कर्जमाफी हाच पर्याय आहे, असे प्रतिपादन शेतकरी मोर्चाचे आयोजक आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी केले.आझाद शेतकरी संघटनेच्या वतीने सिंदपुरी टी-पॉर्इंटवरून शेतकरी मोर्चा काढण्यात आलेला होता. बैलगाडी, ट्रॅक्टर, दुचाकी व जीपगाड्यासह शेतकरी मोर्चात सहभागी झाले. पवनी नगरातून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहचला. मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले. सभेत पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लोमेश वैद्य, टिंकू तिघरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा व्यक्त करण्यात आले. केंद्रात व राज्यात असलेल्या भाजपा सरकारने उत्तरप्रदेशात कर्जमाफीची घोषणा करून कर्जमाफी दिली. महाराष्ट्रात ती का होऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित केला. आझाद शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदार एस.के. वासनिक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर गीते उपस्थित होते.शासनाने शेतकऱ्यांचे सातबारा वरील कर्ज माफ करावे, गोसे धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याचे अपूर्ण काम पूर्ण करावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, खते व बि बियाणे ५० टक्के सवलतीवर उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांचे मुलांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करावी, पिक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा, डाव्या कालव्याच्या लघु वितरिकांचे काम करून चौरास वाळवंट होण्यापासून थांबवावे, नेरला उपसा सिंचन योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे, खापरी गावाचे पुनर्वसन करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना पेंशन योजना सुरु करावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)