लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र शासनाच्या वतीने गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी एक टोल फ्री क्रमांक व 'आमची मुलगी' ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. या कायद्याच्या उल्लंघनाची तक्रार हेल्पलाइनवर प्राप्त झाल्यास व उल्लंघन सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीला १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते.
गर्भलिंग निदान होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभागसुद्धा सतर्क आहे. तीन महिन्यांतून एकदा जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्राची तपासणी केली जाते. मागील सात महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील एकूण ८४ सोनाग्राफी केंद्रांची तपासणी करण्यात आली. परंतु, जिल्ह्यात गर्भलिंग निदान कायद्याचा उल्लंघन होत असल्याची एकही तक्रार प्राप्त झालेली नाही.
तपासणीसाठी स्वतंत्र समिती कार्यरत• शासनाने १९९४ मध्ये गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा केला आहे. या कायद्यांतर्गत नोंदणी केलेल्या सोनोग्राफी, इको मशीन व सीटी स्कॅन मशीन यांची तपासणी तीन महिन्यांतून एकदा केली जाते. यामध्ये काही गडबड आढळून आल्यास संबंधितावर कारवाई केली जाते. तपासणीसाठी स्वतंत्र समिती कार्यरत आहे.
७ महिन्यांत ८४ केंद्रांची तपासणी केली?सोनोग्राफी, इको मशीन, सीटी स्कॅन मशीन यांची तीन महिन्यांतून एकदा तपासणी केली जाते. जिल्ह्यात एकूण ८४ नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्रे आहेत. गत ७ महिन्यात ८४ केंद्रातील उपकरणांची समितीमार्फत तपासणी करण्यात आली. मात्र, तपासणीत कोणतीही गडबड आढळून आली नाही.
मिळते लाखाचे बक्षीसतक्रारीनंतर संबंधित केंद्राची चौकशी केली जाते. चौकशीदरम्यान तक्रारदार साक्षीदार राहतो. न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर लाखाचे बक्षीस दिले जाते.
हेल्पलाइन आणि वेबसाईटवर करा तक्रार• गर्भलिंग निदान होत असल्यास त्याबाबतची तक्रार करण्यासाठी १८००२३३४४७५ हा हेल्पलाइन क्रमांक आहे. तसेच, www.om chimulgi.gov.in या वेबसाइ साइटवर तक्रार दाखल करता येते. मात्र, तक्रार दाखल करण्याचे प्रमाण जिल्ह्यात अतिशय कमी असल्याचे दिसून येते.
सात महिन्यांत एकही तक्रार नाहीस्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्यांचे नाव कळवा व रोख एक लाखाचे बक्षीस मिळवा, अशी पारितोषिक योजना आहे. जिल्ह्यात याबाबत व्यापक प्रसिद्धी करण्यात आली. परंतु, अद्याप एकही तक्रार प्राप्त झालेली नाही
जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या झाल्याची तक्रार प्राप्त झालेल्या नाहीत. योजनेनुसार तक्रारदाराला एक लाखाचे बक्षीस दिले जाते. परंतु अद्याप एकही तक्रार प्राप्त झालेली नाही. योजनेबाबत व जनजागृतीपर जिल्ह्यात विविध माध्यमातून व्यापक जनजागृती सुरू आहे.- डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा.