शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धानाचे चुकारे त्वरित द्या, शेतकऱ्यांची शासनाला हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 05:00 IST

शासनाने जाहीर केलेल्या ५० टक्के बोनसची रक्कम देना बँकेच्या खातेदारांच्या खात्यावर जमा झाली नाही. परिणामी, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील धान येथील धान खरेदी केंद्रावर विकुन जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटत आहे. पण अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्यांना विकलेल्या धानाची रक्कम मिळाली नाही.

ठळक मुद्देदेना बँकेच्या खातेदारांना बोनसही मिळाला नाही : शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव (सडक) येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था अंतर्गत येणाऱ्या कोयलारी (मसरामटोला) येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची धान विकले. त्याचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित चुकारे देण्याची मागणी केली जात आहे. शासनाने जाहीर केलेल्या ५० टक्के बोनसची रक्कम देना बँकेच्या खातेदारांच्या खात्यावर जमा झाली नाही. परिणामी, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील धान येथील धान खरेदी केंद्रावर विकुन जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटत आहे. पण अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्यांना विकलेल्या धानाची रक्कम मिळाली नाही. खरीप हंगामात विकलेल्या धानाला शासनाने ७०० रुपये प्रती क्विंटल बोनस देण्याचे जाहीर केले होते. त्यापैकी ५० टक्के बोनसची रक्कम को-ऑप बँक व स्टेट बँकेच्या खातेदारांच्या खात्यात जमा झाली. मा पण ज्या शेतकऱ्यांचे खाते देना बँकेत आहेत अशा खातेदारांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा झालीच नाही. धानाचे चुकारे देण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. निवडणूक काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या नेत्यांची फौज तयार होते. मात्र जेव्हा केव्हा शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतात त्यावेळी मात्र सर्वच भूमिगत होतात असे शेतकरी बोलत आहेत. सध्या या परिसरातील जवळपास शंभर टक्के शेतकऱ्यांची रोवणी आटोपली आहे. त्यामुळे मजुरांची मजूरी, खत खरेदी, ट्रॅक्टर भाडे, पाल्याचा शैक्षणिक खर्च व दैनंदिन लागणारा खर्च व इतरांचे देणे अशा अनेक खर्चाच्या बाबी धानाच्या चुकाऱ्या अभावी अडल्या आहेत. शेतकरी आर्थिक संकटाने गुरफटला आहे. शासन प्रशासनाने याची त्वरीत दखल घ्यावी व धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात विनाविलंब जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड