शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शाळा डिजिटल करण्यासाठी निधी द्या

By admin | Updated: March 12, 2017 00:46 IST

जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक व शाळा डिजिटल करणे आवश्यक असल्याने ...

शिक्षक संघाची मागणी : गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनपवनी : जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक व शाळा डिजिटल करणे आवश्यक असल्याने एप्रिल २०१७ अखेर १०० टक्के शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेले आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामपंचायतला प्राप्त १४ व्या वित्त आयोगातील निधी शाळा डिजिटल करण्यासाठी घ्यावा अशी मागणी करणारे निवेदन अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे पवनी तालुका शाखेतर्फे गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे.सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक तसेच जिल्हातील सर्व ग्रामसेवक यांची संयुक्त कार्यशाळा घेवून शाळा डिजीटल करण्याचे उद्दीष्ट शाळा मुख्याध्यापकांना देण्यात आले. १४ व्या वित्त आयोगातील निधी किंवा लोकसहभागातून शाळा डिजीटल करावयाच्या आहेत. मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी १० फेब्रुवारी रोजी पत्र काढून जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना योजनेच्या अमलबजावणीसाठी सुचना केलेल्या आहेत. त्या आधारे लाखांदूरचे गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या ग्रामपंचायतच्या सविचांना १४ व्या वित्त आयोगातून शाळा डिजीटल करण्याकरिता निधी उपलब्ध करुन दयावा अशा सुचना केलेल्या आहेत. पवनीचे गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांचे स्तरावरून ग्रामपंचायत सचिवांना डिजीटल शाळांच्या उद्दीष्टपूर्तीसाठी सहकार्य करण्याच्या सुचना निर्गमित कराव्या अशी मागणी करणारे निवेदन प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष सुधाकर गोल्हर व सरचिटणीस सुरेंद्र उके यांनी गटविकास अधिकारी अनिता तेलंग व सहायक गटविकास अधिकारी बी. वाय. निमसरकार यांना दिले आहे. ग्रामपंचायतस्तरावर नियोजन करून १४ व्या वित्त आयोगाची रक्कम खर्च करावयाची असते. ग्रामपंचायतने नियोजनात शिक्षणासाठी किती तरतूद केलेली आहे. ते पाहून सुचना देण्यात येतील, अशी माहिती दिली. (तालुका प्रतिनिधी)