शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फळबाग बोडीला ५० कोटींचा निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:52 IST

आॅनलाईन लोकमततुमसर : नागपूर येथील राष्ट्रीय फळबाग मंडळाला ५० कोटी निधी देऊन कृषी मालाला उत्पादन खर्च जास्त येत असून नफयाऐवजी तोटा सहन करावा लागत आहे. केंद्र शासनाने संबंधित समस्या दूर करण्याकरिता योजना तयार करण्याची मागणी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदनातून ...

ठळक मुद्देकृषीमंत्र्यांना निवेदन : पत्रव्यवहार हिंदीतून करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमततुमसर : नागपूर येथील राष्ट्रीय फळबाग मंडळाला ५० कोटी निधी देऊन कृषी मालाला उत्पादन खर्च जास्त येत असून नफयाऐवजी तोटा सहन करावा लागत आहे. केंद्र शासनाने संबंधित समस्या दूर करण्याकरिता योजना तयार करण्याची मागणी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदनातून केली आहे.विदर्भातील शेतकरी फळबाग शेतीकडे वळावा, याकरिता शासनाने मदत करावी. शेतमाल (धान्य व फळभाजी) यांना उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के नफा मिळवून समर्थन मूल्य जाहिर करणे, शेतकऱ्यांचा शेतमाल शासनाने जाहिर केलेल्या समर्थन मूल्यापेक्षा कमी किंमतीत विकु नये याची जबाबदारी शासनाने घ्यावी, शेतकऱ्यांना शेतमाल नुकसानीत विक्री करण्याचे संकट येऊ नये, याची जबाबदारी शासनाने घ्यावी, तहसीलदारावर नियंत्रणाची जबाबदारी सोपवावी. शेतमाल धान्य व भाजीपाला यांचा उत्पादन खर्च व ५० टक्के नफा मिळवून खरेदीची व्यवस्था सरकारने करावी आदी इत्यादी मागण्यांचा त्यात समावेश आहे. नागपूर येथील राष्ट्रीय फळबाग केंद्राचे कार्यालय असून या केंद्राद्वारे शेतकºयांशी पत्रव्यवहार हा इंग्रजीत सुरु आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना कार्यालयाचा पत्ता माहित नाही. कार्यालयाशी पत्रव्यवहार हा तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सुरु करावा व पत्रव्यवहाराची भाषा किमान हिंदी असावी अशी मागणीही शिशुपाल पटले यांनी केली.