शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

प्रत्येक क्षेत्रात मुलींनी नावलौकिक मिळवला आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 00:34 IST

अंतरिक्षापासून प्रत्येक क्षेत्रात महिलांनी नावलौकिक मिळवला आहे. स्त्रियांनी प्रत्येक संधीचे सोने करावे. कायद्याचा उपयोग प्रथम ढाल म्हणून नंतर तलवार म्हणून करावा.

साकोली नगरपरिषदचा उपक्रम : एन. के. वाळके यांचे प्रतिपादनसाकोली : अंतरिक्षापासून प्रत्येक क्षेत्रात महिलांनी नावलौकिक मिळवला आहे. स्त्रियांनी प्रत्येक संधीचे सोने करावे. कायद्याचा उपयोग प्रथम ढाल म्हणून नंतर तलवार म्हणून करावा. जे जे चांगले आहे त्यानुसार वागणे म्हणजे कायद्याचे पालन करणे आहे. आपल्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये, याचे भान प्रत्येक व्यक्तीने ठेवले तर समाजातील तंटे कमी होतील, असे प्रतिपादन साकोली दिवानी न्यायालयाचे न्यायाधीश एन.के. वाळके यांनी केले.साकोली येथील नगरपरिषदेच्या सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. पुरूषांच्या तुलनेत ती कमकुवत नाही. पुरूष नोकरी, व्यवसाय, पैसे कमावणे असे एकच क्षेत्र सांभाळते पण महिला घर, नौकरी, व्यवसाय, अनेक क्षेत्र एकाचवेळी सांभाळते. महिला घर, समाज, राज्य, राष्ट्राला विकासाच्या शिखरावर पोहचू शकते. स्त्री पंतप्रधान राष्ट्रपती होऊ शकते. सैन्यभरतीत ही महिला अग्रेसर आहेत. अंगणवाडी सेविकाने घडवलेला मुलगा अधिकारी बनू शकतो म्हणून महिलांनी मिळालेल्या क्षेत्रात पूर्ण झोकून काम करावे. ५० वर्षापुर्वी मुलींना आजसारखे शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले असते तर देशाचा विकास आजच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक झाला असता, असे प्रतिपादन न्यायाधीश वाळके यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष धनवंता राऊत, तहसिलदार अनिल खडतकर, सहदिवानी न्यायाधीश ए.एम. कासिम, संरक्षण अधिकारी चुन्नीलाल लोथे, सविता ब्राम्हणकर, रेखा भाजीपाले, मनिषा काशिवार, गीता कापगते, इंद्रायणी कापगते, उपाध्यक्ष तरूण मल्लानी, जगन उईके, शमीम शेख, पी.एम. कोटांगले, नालंदा टेंभुर्णे, राजश्री मुंगुलमारे, वनिता डोये, लता कापगते, अनिता पोगळे, मीना लांजेवार, नीशा इसापुरे, रजनी करंजेकर, गीता बडोले, अ‍ॅड. कातोरे, सुनिल कापगते, रवी परशुरामकर उपस्थित होते. यावेळी गीता कापगते म्हणाल्या स्त्रीया आत्मनिर्भर बनत आहेत. शिक्षणाच्या सहायाने स्त्री कुटुंबाचा आधार बनत आहे. रेखा भाजीपाले यांनी महिलांनी राजकारणाचा उपयोग समाज कारणासाठी आपल्या गाव, समाजाचा विकास साधावा. सविता ब्राम्हणकर म्हणाल्या नवीन आवाहन स्विकारताना महिलांनी टिकेची पर्वा करू नये. रजनी करंजेकर यांनी स्त्रीया कठोर परिश्रम घेवून प्रत्येक काम करतात. नगराध्यक्ष धनवंता राऊत यांनी सावित्री, जिजामाता, अहिल्याबाई या आमच्या आदर्श आहेत. त्यांच्याप्रमाणे काम करायचे असल्याचे सांगितले. संचालन नगरसेविका रोहिणी मुंगलमारे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)