शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

Maharashtra HSC result 2018 : मुलांपेक्षा मुलीच सरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 22:45 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल बुधवारला दुपारी आॅनलाईनद्वारे घोषित केला. यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ८८.७३ टक्के इतका लागला असून यावर्षीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. ही परीक्षा एकूण १८,५४४ विद्यार्थ्यांनी दिली असून १६,४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

ठळक मुद्देबारावीचा निकाल ८८.३५ टक्के : नानाजी जोशी शाळेचा रितेश हर्षे जिल्ह्यात प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल बुधवारला दुपारी आॅनलाईनद्वारे घोषित केला. यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ८८.७३ टक्के इतका लागला असून यावर्षीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. ही परीक्षा एकूण १८,५४४ विद्यार्थ्यांनी दिली असून १६,४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.भंडारा जिल्ह्यातून शहापूर येथील नानाजी जोशी महाविद्यालयाचा विद्यार्थी रितेश हर्षे हा पहिला आला. त्याला ९५.३८ टक्के गुण मिळाले. भंडारा येथील लाल बहाद्दूर शाळेची विद्यार्थिनी खुशबु उमाकांत साठवणे ९४.६२ टक्के, नानाजी जोशी शाळेचा विद्यार्थी अंकुर वासनिक ९४.४६ टक्के गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले. बारावीच्या निकालात भंडारा जिल्हा नागपूर विभागात तिसऱ्या स्थानावर असून यावर्षीही मुलींनी बाजी मारली असून मुलांची टक्केवारी ८५.७२ इतकरी तर मुलींची टक्केवारी ९१.७६ इतकी आहे.१५४ कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या बारावीच्या परीक्षेत १८ हजार ५५३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १६ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १६ हजार ४५५ विद्यार्थी ऊतीर्ण झाले. विद्यार्थ्यांमध्ये ७ हजार ९६० मुले तर ८ हजार ४९५ मुलींचा समावेश आहे. यात ६८३ विद्यार्थी प्राविण्यप्राप्त ठरले. ५ हजार २५१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९ हजार ९७१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ५५० विद्यार्थी सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले.तालुकानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी१६ हजार ४५५ ऊतीर्ण विद्यार्थ्यांमध्ये भंडारा तालुक्यातून ४,६०७ पैकी ४,२६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लाखांदूर तालुक्यातून १,४९८ पैकी १,३५७ विद्यार्थी, लाखनी तालुक्यातून २,४५९ पैकी २,१९१ विद्यार्थी, मोहाडी तालुक्यातून २,३२० पैकी १,९११ विद्यार्थी, पवनी तालुक्यातून २,३१४ पैकी २,०६३ विद्यार्थी, साकोली तालुक्यातून २,३२० पैकी २,१२५ विद्यार्थी, तुमसर तालुक्यातून ३,०२६ पैकी २,२४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.शाखानिहाय निकालजिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९६.६२ टक्के, कला शाखेचा निकाल ८२.१८ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९३.८६ टक्के तर एमसीव्हीसी शाखेचा निकाल ७५.३६ टक्के लागला आहे. शाखानिहाय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेच्या ७,८७४ विद्यार्थ्यांमध्ये ४३२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, २,७६६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४,२७२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १३८ विद्यार्थी सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. कला शाखेच्या ९,१३१ विद्यार्थ्यांमध्ये १४० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, १,९३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ५,०४४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ३८५ विद्यार्थी सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेच्या ९९३ विद्यार्थ्यांमध्ये १०२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ३९३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४१३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २४ विद्यार्थी सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. एमसीव्हीसी शाखेच्या ५५२ विद्यार्थ्यांमध्ये ९ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, १६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २४२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ३ विद्यार्थी सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले.२६ शाळेचा निकाल लागला शंभर टक्केजिल्ह्यातील २६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात जे.एम.पटेल कॉलेज भंडारा, नुतन कन्या शाळा, नानाजी जोशी शाळा शहापूर, शंकरराव काळे शाळा कारधा, इंदिरा गांधी शाळा मोहदुरा, विकास ज्युनियर कॉलेज खरबीनाका, पाडंव सायन्स अकादमी ज्युनिअर कॉलेज भिलेवाडा, सन्नीज स्प्रिंग डेल शाळा भंडारा, सिद्धार्थ ज्युनियर कॉलेज लाखांदूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्युनियर कॉलेज लाखांदूर, जिल्हा परिषद ज्युनियर कॉलेज पिंपळगाव, जिल्हा परिषद पोहरा, राष्ट्रमाता इंदिरा गांधी शाळा मुरमाडी, माडर्न ज्युनियर कॉलेज सातोना, कला वाणिज्य महाविद्यालय करडी, भीमाताई कॉन्व्हेंट मोहाडी, एमपीएल ज्युनिअर कॉलेज पवनी, महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज कोंढा, प्रकाश ज्युनिअर कॉलेज अड्याळ, जिल्हा परिषद ज्युनिअर कॉलेज सानगडी, रामजी कापगते ज्युनिअर कॉलेज जांभळीसडक, निर्धनराव पाटील वाघाये ज्युनिअर कॉलेज वडेगाव खांबा, एस.एन. मोर कॉलेज तुमसर, जनता ज्युनिअर कॉलेज तुमसर, महाराष्ट्र ज्युनिअर कॉलेज सिहोरा, मातोश्री ज्युनिअर कॉलेज तुमसर या शाळांचा समावेश आहे.निकालात भंडारा तालुका अव्वलभंडारा जिल्ह्याचा निकाल ८८.७३ टक्के लागला असून निकालात सातही तालुक्यातून भंडारा तालुका आघाडीवर आहे. मोहाडी तालुक्याचा निकाल पिछाडीवर आहे. यात भंडारा तालुका ९२.६४ टक्के, साकोली तालुका ९१.५९ टक्के, लाखांदूर तालुका ९०.५९ टक्के, पवनी तालुका ८९.१५ टक्के, लाखनी तालुका ८९.१० टक्के, तुमसर तालुका ८३.९४ टक्के, मोहाडी तालुका ८२.३७ टक्के लागला आहे.यावर्षीही मुलींनी मारली बाजीयावर्षी बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. ९,२९२ मुले आणि ९,२६१ मुली असे १८,५५३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यानंतर ९,२८६ मुले आणि ९,२५८ मुली असे १८,५४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७,९६० मुले आणि ८,४९५ मुली उत्तीर्ण झाले. यात मुलांची टक्केवारी ८५.७२ तर मुलींची टक्केवारी ९१.७६ इतकी आहे. मागील पाच वर्षांपासून भंडारा जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८