शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

घोणस सापाने दिला तब्बल ५९ पिलांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 05:00 IST

लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील वाईल्ड हार्ट फाऊंडेशन तथा निसर्गमित्र ग्रूपच्या सर्पमित्रांना चकारा येथे ९ जुलै रोजी एक अतिजहाल विषारी साप निघाल्याची माहिती मिळाली. समीत हेमणे, संदीप शेंडे, रोशन नैताम यांच्यासह काही सर्पमित्र चकारा येथे पोहचले. साप पकडायला उशिर झाल्याने रात्री जंगलात सोडणे शक्य नव्हते. त्यामुळे या घोणस सापाला सुरक्षित पकडून निसर्गमित्र ग्रूपच्या मित्रांनी जेवनाळा येथे आणले.

ठळक मुद्देजेवनाळाची घटना । सर्पमित्रामुळे मिळाले जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी/पालांदूर : गावात निघालेल्या घोणस सापाला पकडून एका सर्पमित्राने आपल्या घरी सुरक्षित ठेवले. दुसऱ्या दिवशी या सापाला जंगलात सोडून देण्याचा निश्चय केला. मात्र सकाळी बघतो तर काय? या घोणस सापाने एक दोन नव्हे तब्बल ५९ पिलांना जन्म दिला. पिलांसह घोणस सापाला निसर्गमुक्त करण्यात आले. ही घटना आहे लाखनी तालुक्यातील जेवनाळाची.लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील वाईल्ड हार्ट फाऊंडेशन तथा निसर्गमित्र ग्रूपच्या सर्पमित्रांना चकारा येथे ९ जुलै रोजी एक अतिजहाल विषारी साप निघाल्याची माहिती मिळाली. समीत हेमणे, संदीप शेंडे, रोशन नैताम यांच्यासह काही सर्पमित्र चकारा येथे पोहचले. साप पकडायला उशिर झाल्याने रात्री जंगलात सोडणे शक्य नव्हते. त्यामुळे या घोणस सापाला सुरक्षित पकडून निसर्गमित्र ग्रूपच्या मित्रांनी जेवनाळा येथे आणले. रात्रभर पाण्याच्या रिकाम्या ड्रममध्ये ठेवले. मात्र सकाळी या ड्रममध्ये बघितले तर या घोणस सापाने तब्बल ५९ पिलांना जन्म दिल्याचे दिसले. या घटनेची माहिती गावात होताच अनेकांनी तेथे धाव घेतली. अड्याळ येथील वन विभागाला देण्यात आली. त्यांनी पंचनामा करून घोणस व ५९ पिलांना वनविभागाच्या राखीव वनक्षेत्रात निसर्गमुक्त केले. यासाठी आदेश गोंदोळे, दीनदयाल गिºहेपुंजे, राकेश हेमणे यांनी सहकार्य केले.घोणस हा अतिविषारी साप असून पर्यावरणासाठी उपयुक्त आहे. आम्ही सापाला व त्याच्या पिलांना सुरक्षित सोडले आहे. परिसरात कोणताही साप आढळल्यास सर्पमित्राला बोलावून त्यांना जीवदान द्यावे आणि पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावावा.-समीप हेमणे, सर्पमित्र जेवनाळा

टॅग्स :snakeसाप