शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

वनसंपदेवर तस्करांची ‘कुऱ्हाड’

By admin | Updated: March 21, 2016 00:28 IST

महाराष्ट्राच्या एकूण वनक्षेत्रापैकी सर्वाधिक वनक्षेत्र पूर्व विदर्भात आहे.

आज जागतिक वन दिन : वृक्षतोडीचा पर्यावरणावर परिणामदेवानंद नंदेश्वर भंडारामहाराष्ट्राच्या एकूण वनक्षेत्रापैकी सर्वाधिक वनक्षेत्र पूर्व विदर्भात आहे. या जंगलात अनेक मौल्यवान वृक्ष व प्राणी असल्यामुळे तस्करांची नजर येथील जंगलावर नेहमीच असते. काही वर्षांपासून वनसंपदेवर अमानुष कुऱ्हाड चालविल्यामुळे निसर्गाचे चक्र उलटे फिरत आहे. त्यामुळे ३३ टक्के वनक्षेत्र कायम राखणे वन विभागाला मोठे आव्हान ठरत आहे. वनांचा ऱ्हास होण्यामागे कुचकामी प्रशासकीय यंत्रणा जेवढी कारणीभूत आहे तेवढीच माणसांची स्वार्थी प्रवृत्तीही कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी वृक्ष संवर्धन करणे गरजेचे आहे. भंडारा वनविभागाच्या कार्यक्षेत्रात भंडारा, लाखनी, पवनी, लाखांदूर, साकोली, मोहाडी व तुमसर हे सात तालुके आहेत. भंडारा वनविभागाचे १० वनपरिक्षेत्रात विभाजन करण्यात आले आहे. भंडारा, अड्याळ, पवनी, साकोली, तुमसर, जांब (कांद्री), लेंडेझरी, नाकाडोंगरी आणि लाखांदूर या वनक्षेत्राचा समावेश आहे. या विभागात ३८ परिमंडळ असून नियत क्षेत्रांची संख्या १५६ एवढी आहे. जिल्ह्यातील एकूण ३,७१६.६५ भौगोलिक क्षेत्रापैकी १२०३.५५६ चौ.कि.मी. वनाचे क्षेत्र आहे. वनविभागाकडे ८८१.८५४ चौ.कि.मी., महाराष्ट्र वन विकास महामंडळाकडे ९१.४३६ चौ.कि.मी., वन्यजीव विभागाकडे २२५.४८२ चौ.कि.मी. तर मोहघाटा रिसर्च सेंटरकडे ४.७८४ चौ.कि.मी. वन क्षेत्र आहे. ५००४७.११९ कि़मी. मध्ये राखीव, २७७.७६७ कि़मी. मध्ये संरक्षीत वन, ९९.६५४ कि़मी. मध्ये झुडपी जंगल तर ४.५१७ वर्ग कि़मी. मध्ये अवर्गीकृत क्षेत्राचा समावेश आहे. जिल्ह्यत तसेच परिसरात घनदाट जंगल व वन्यप्राण्यांच्या अधिवास आहे. या जंगलात वाघासारख्या उमद्या प्राण्यासह बिबट, हरिण, अस्वल आदी वन्यप्राणी आहेत. तसेच साग व अन्य प्रजातींची मौल्यवाण झाडेही मोठ्या प्रमाणात आहेत. हीच संधी हेरून वन तस्करांनी येथील जंगलांना ‘टारगेट’ केले आहे. वन विभागातर्फे वृक्ष कत्तलीच्या आकडेवारीची नोंद केली जाते. त्यानंतरही वृक्षतोड सतत सुरूच आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनांची भूमिका महत्वाची आहे. परंतु, ‘ओपन प्रॉपर्टी’ असलेल्या वनसंपदेवर कुणीही आक्रमण करीत असल्याने ही संपदा आता हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. विविध कारणांमुळे वृक्षांवर कुऱ्हाड चालत असल्याने वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. सजीव सृष्टी ‘ग्लोबल वार्मिंग’च्या संकटात अडकली आहे. निसर्गचक्र बदलत असल्यामुळे त्याचा परिणाम सजीवांवर होत आहे. ऋतुंमध्ये होणारा बदल, गारपीट, अतिवृष्टी, वातावरणातील बदल हा त्याचाच परिणाम आहे. माणसाच्या स्वार्थी प्रवृत्तीने जंगलाचे होत्याचे नव्हते केले. त्याच्या या प्रवृत्तीपुढे वन विभागाच्या यंत्रणेचे प्रयत्नही अपयशी ठरले आहे. वन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बळावर जंगलाचे संरक्षण केले जात आहे. असे असले तरी वनांचे संरक्षण करणारा वन विभाग शहरात जास्त व जंगलात कमी वास्तव्य करीत असल्यामुळे वन तस्करांचे मनसुबे सातत्याने वाढत आहे. यासाठी कठोर उपाययोजना करुन वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज आहे.