शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जनरल तिकिटांची विक्री बंदच; रेल्वेत सर्वसामान्यांना ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 05:00 IST

रेल्वे विभागाने विशेष गाड्यांचा दर्जा काढला असला तरी या गाड्यांना अद्यापही जनरलचे डबे जोडलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतच आहे. परिणामी आरक्षित डब्यातील गर्दी वाढली असून आरक्षित तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांना फुकट्या प्रवाशांचा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली असताना रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ झाली असतानासुध्दा रेल्वे अद्यापही जनरलचे डबे जोडले नसून जनरल तिकीट विक्रीसुद्धा सुरू केली नाही.

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाचा जोर कमी होताच रेल्वे विभागाने पंधरा दिवसांपूर्वी नियमित रेल्वे गाड्यांना दिलेला विशेष गाड्यांचा दर्जा काढला असला तरी एक्स्प्रेस गाड्यामध्ये तिकीट आरक्षित केल्याशिवाय प्रवास करता येत नाही. तर जनरल तिकिटांची विक्री बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहे. रेल्वे विभागाने विशेष गाड्यांचा दर्जा काढला असला तरी या गाड्यांना अद्यापही जनरलचे डबे जोडलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतच आहे. परिणामी आरक्षित डब्यातील गर्दी वाढली असून आरक्षित तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांना फुकट्या प्रवाशांचा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली असताना रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ झाली असतानासुध्दा रेल्वे अद्यापही जनरलचे डबे जोडले नसून जनरल तिकीट विक्रीसुद्धा सुरू केली नाही. त्यामुळे जनरलचे डबे केव्हा जोडणार असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. 

सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस - गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस- गोंदिया-काेल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस- अजमेर -पुरी एक्स्प्रेस- हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस- समता एक्स्प्रेस- हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस - गोंदिया-झारसुकडा एक्सप्रेस

आरक्षित तिकीट असेल तरच प्रवास - रेल्वे विभागाने पंधरा दिवसांपूर्वी नियमित गाड्यांना दिलेला विशेष गाड्यांचा दर्जा काढला. मात्र या गाड्यांना अद्यापही जनरलचे डबे जोडले नाहीत. त्यामुळे ज्या प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले आहे त्याच प्रवाशांना प्रवास करता येत आहे. सर्वसामान्य प्रवाशांचे हाल अद्यापही कायम असून त्यांना अतिरिक्त तिकिटाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

आरक्षित डब्यात वाढले फुकटे प्रवासी- नियमित गाड्यांना अद्यापही जनरल डबे जोडलेले नाही. त्यामुळे अनेक फुकटे प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करीत आहे. त्यामुळे याचा त्रास तिकीट आरक्षित करून जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.- रेल्वे विभागाने सुद्धा या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करुन लाखो रुपयांचा दंड वसूृल केला आहे. यातून रेल्वेचे उत्पन्न वाढले असले तरी प्रवाशांचा त्रास मात्र वाढला आहे.  ही समस्या दूर करावी.

 प्रवासी म्हणतात..

कोरोनाच्या नावावर मागील दीड वर्ष नियमित गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा देऊन एकप्रकारे प्रवाशांची लूट केली. आता विशेष गाड्यांचा दर्जा काढला असला तरी जनरल डबे न जोडल्याने अतिरिक्त तिकिटाचा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे. -हर्षल लाडे, प्रवासी

रेल्वेने अद्यापही एमएसटीची सुविधा सुरू केली नाही तर नियमित गाड्यांचे तिकीट दर अद्यापही कमी केलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य आणि प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वेने नियमित गाड्यांना जनरलचे डबे त्वरित जोडावे.- श्रवण राऊत, प्रवासी

 

टॅग्स :railwayरेल्वे