शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

सर्वसामान्य व्यक्तीलाही न्यायाचा अधिकार

By admin | Updated: January 4, 2015 23:05 IST

प्रत्येक व्यक्तीला न्यायाचा अधिकार दिलेला आहे. न्याय प्रक्रिया सुलभतेने होण्यासाठी प्रत्येक तालुक्यात न्यायालये स्थापन केली आहेत. न्यायदानाची प्रक्रिया पक्षकारावर अन्याय होता कामा नये.

भूषण गवई यांचे प्रतिपादन : मोहाडी येथे दिवानी / फौजदारी न्यायालयाचे उद्घाटनमोहाडी : प्रत्येक व्यक्तीला न्यायाचा अधिकार दिलेला आहे. न्याय प्रक्रिया सुलभतेने होण्यासाठी प्रत्येक तालुक्यात न्यायालये स्थापन केली आहेत. न्यायदानाची प्रक्रिया पक्षकारावर अन्याय होता कामा नये. त्यामुळे न्यायदान ठराविक काळातच होणे गरजेचे आहे. यासाठी अधिवक्त्यांनीही जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. मोहाडी येथील न्यायालय इमारतीचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.मोहाडी येथे भंडारा तुमसर राज्य मार्गावर चार एकर जागेत दिवाणी व फौजदारी न्यायालयाची दोन माळ्याची प्रशस्त इमारत बांधण्यात आली आाहे. या न्यायालयाचे उद्घाटन न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गंगाधर अकर्ते होते. यावेळी पाहुणे म्हणून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एस. शर्मा, अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.बी. येनूरकर, मुख्य न्यायदंडाधिकारी एम.एस. लोणे, सहदिवाणी न्यायाधीश आर.डी. पतंगे, शासकीय अभियोक्ता विजय दलाल, जिल्हा न्यायालय प्रबंधक डी.व्ही. देशमुख यांच्यासह गोंदिया येथील न्यायाधीश, वकील संघाचे अध्यक्ष उपस्थित होते. याप्रसंगी न्यायमूर्ती अशोक भंगाळे यांनी न्यायालये तयार केले जातात. मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असतो. न्यायदान करताना न्यायाधिशांना तणाव राहता कामा नये. त्यांच्यासाठी त्यांच्या परिवाराला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणेही गरजेचे आहे. न्यायदान प्रक्रियेत सर्वांचा सहभाग उत्तम रितीने झाल्यास न्यायदानात विलंब होत नाही व पक्षकाराला न्याय होण्यासाठी मदत मिळते. काही प्रकरणे लोकन्यायालयात सामंजस्याने सोडविल्यास पक्षकारांना त्याचा फायदा होतो. याप्रसंगी तहसीलदार कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी दिलीप आगलावे, जि.प. सदस्य मंजुषा पातरे, रागिनी सेलोकर, यशवंत थोटे, सार्वजनिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा व सत्र न्यायाधीश गंगाधर अकर्ते यांनी केले. संचालन तिसरे सहदिवाणी न्यायाधीश रत्ना डफरे यांनी तर आभारप्रदर्शन अ‍ॅड.भाऊराव सेलोकर यांनी केले. कार्यक्रमासाठी न्यायालयाचे शाहीना रिझवी, गोपाल आगाशे, अशोक भुरे, विजय भिवगडे, सुमती निखाडे, अंबादास डोंगरे, सुरेश केसलकर, गंगाधर फटे, राजेश कडव, केशव चाफरे, बेबीनंदा सांडेकर, रामपाल रंभाड, रमेश मेंढे, गोपाल गायधने यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)