शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

रंगाची उधळण न करणारे भंडारा जिल्ह्यातील गवराळा गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 1:13 PM

लाखांदूर तालुक्यातील गवराळा या गावातील नागरिक मागील २५ वर्षांपासून रंगाचा सण भक्तीरंगात रंगून साजरा करतात. होळीच्या दोन दिवसांत या गावात ग्रामसफाई करण्यात येते.

ठळक मुद्दे२५ वर्षांपासूनची परंपरा लाकडांऐवजी केरकचऱ्याची करतात होळीआदर्श परंपरा राज्यात होळी व धुळवड मोठ्या उत्साहात साजरा करून लाकूड जाळले जाते. त्यामुळे प्रदूषण होते. रंगातही लाखो रूपये खर्च होतात. निष्पाप प्राण्यांचे बळी घेतले जातात. यामुळे पर्यावरणाची हानी होते. हा प्रकार गवराळा या गावात होत नाही. त्यामुळे हे गाव सर्

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: होळीच्या दुसरा दिवशी सर्वच जण उत्साहात रंगांची उधळण करतात. परंतु, लाखांदूर तालुक्यातील गवराळा या गावातील नागरिक मागील २५ वर्षांपासून रंगाचा सण भक्तीरंगात रंगून साजरा करतात. होळीच्या दोन दिवसांत या गावात ग्रामसफाई करण्यात येते. यामुळे हे गाव संपूर्ण राज्यात आपले वेगळेपण टिकवून आहे.हिंदू धर्मात होळीच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळीच्या दिवशी पुरणपोळी, साखरेची गाठी आणि धुळवडीच्या दिवशी रंगांची उधळण सर्वजण करतात. परंतु, गवराळा हे गाव या यासाठी अपवाद ठरले आहे. येथे कर्मयोगी अनासक्त ब्रह्मलीन किसनबाबा अवसरे यांचा २५ वा पुण्यतिथी महोत्सव २५ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत आयोजित केला आहे.सन १९९२ मध्ये होळीच्या दिवशी गावातील धार्मिकस्थळाच्या बांधकामासाठी जागा दान मागून सायंकाळी मंदिरात त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, ज्या दिवसापासून अवसरे बाबा गावात आले तेव्हापासून गावात शांतता आल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे. तेव्हापासून गावकऱ्यांनी एकत्र येऊन होळी व धुळवडीचा सण परंपरेप्रमाणे साजरा न करता बाबांचा पुण्यतिथी महोत्सव म्हणून साजरा करण्याचे ठरविले. त्यानंतरच्या पिढ्यांनी हीच प्रथा सुरू ठेवली. गावात होळी पेटविली जाते. परंतु, ती लाकडांची नव्हे तर ग्रामसफाई करून जमा झालेल्या केरकचऱ्याची होळी असते. धुळवडीच्या दिवशी ग्रामगीता तत्त्वज्ञान, ग्रामसभा, ग्रामस्वराज्य या विषयांवर अनुभवी लोकांचे गावाचा विकास साधण्यासाठी मार्गदर्शन मिळते. हा कार्यक्रम ग्रामगीताचार्य तुकारामदादा यांचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या उपस्थितीत व संतांच्या सहवासात दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो. या कार्यक्रमात श्री गुरुदेव सेवा मंडळ तत्त्वज्ञान व ग्रामकुटुंब योजना राबवून ग्रामस्वराज्य संकल्पना ठरवली जाते. तीन दिवसीय कार्यक्रमात ग्रामगीता प्रवचन, कीर्तन, भजन, पालखी, प्रदक्षिणा, अवसरे महाराजांना मौन श्रद्धांजली यासह रक्तदान, नेत्रतपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते.

 

टॅग्स :Holi 2018होळी २०१८