शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

संगम येथे भरते मद्यपींची जत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

कोरोना व्हायरस रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यातच संचारबंदी व जिल्हा बंदीही लागू करण्यात आली आहे. लोकांनी एकत्र गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यातच हॉटेल्स, रेस्टारंट, देवस्थाने, पानटपरी, देशी, विदेशी दारुची दुकाने आदी प्रतिष्ठाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

ठळक मुद्देआदेशाचे उल्लंघन : संचारबंदीलाही खो, स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असतानाच राज्य शासनानेही गंभीर पावले उचलली आहेत. गर्दी टाळण्यासाठी विविध दुकाने व आस्थापना बंद करण्याचे आदेशही दिले आहेत. यात हॉटेल्स, देशी विदेशी दारुची दुकाने व पानटपरी बंद असल्याने मद्यप्राशन करण्यासाठी संगम येथे मद्यपींची गर्दी पहायला मिळत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे सरळसरळ उल्लंघन होत आहे.कोरोना व्हायरस रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यातच संचारबंदी व जिल्हा बंदीही लागू करण्यात आली आहे. लोकांनी एकत्र गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यातच हॉटेल्स, रेस्टारंट, देवस्थाने, पानटपरी, देशी, विदेशी दारुची दुकाने आदी प्रतिष्ठाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र ग्रामीण भागात शासनाच्या आदेशाला न जुमानता राजरोसपणे दारुची दुकाने सुरु ठेवल्याने मद्यपींची जत्रा पहायला मिळत आहे. असाच प्रकार भंडारा शहरालगत असलेल्या संगम पुनर्वसन येथे पहायला मिळत आहे. येथे दारुची दुकाने सुरु असल्याने परिसरातील भंडारा शहर, गणेशपूर, भोजापूर, बेला, दवडीपार, पिंडकेपार, मुजबी, जाख, फुलमोगरा, कवडसी, उमरी, मारेगाव, शहापूर आदी गावातून तळीराम संगम येथे दारु पिण्यासाठी येत आहेत. परिणामी येथील सामाजिक सुरक्षितता धोक्यात आली आहे.या संबंधात स्थानिक प्रशासनाची भूमिकाही संशयास्पद दिसत आहे. प्रशासनाने ही दारुची दुकाने बंद करून गावाल व्हायरसच्या प्रादूर्भावाला वाचवावे अशी मागणी गावकरी करीत आहेत.बिसलरीच्या बॉटलमधून दारुची विक्रीदारु विक्रेत्यांनी दारु विकण्यासाठी अनोखी शक्कल लढविली आहे. बिसलरीच्या बॉटलमध्ये दारु पार्सल म्हणून दिली जाते. तसेच ग्रामपंचायत प्रशासनातील एका पदाधिकाऱ्याला हाताशी धरून आठ दिवसांपासून गावातील पथदिवे बंद ठेवले जात आहेत. याच अंधाराचा फायदा घेत मद्यपींना दारुची विक्री केली जात आहे. दारु विक्रेत्यांनी दारुचा मुबलक साठा केल्याने मागेल त्याला तेवढे दारु दिली जात आहे. संगम येथील या प्रकाराने कायदा व सुव्यवस्थेचे नियम धाब्यावर बसविण्यात आल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. यावर कारवाई करावी अशी सर्वस्तरातून मागणी होत आहे.

 

टॅग्स :Socialसामाजिक