शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"गॅस, भांडे, भूत... काहीच नाही!" ; अंनिसच्या भेटीनंतर उघड झाला ‘रहस्य’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:55 IST

Bhandara : बिनाखीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली जनजागृती

चुल्हाड (सिहोरा): बिनाखी येथील कैलास गौतम यांचे घरी गेल्या आठ दिवसांपासून होणाऱ्या रहस्यमय प्रकारावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे जनजागृती नंतर आळा बसला आहे. सोमवारी (दि २१) ला सायंकाळी ७ वाजता पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. तब्बल दोन तास घरात पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडल्यानंतर ना गॅस सुरु झाली. ना भांडे पडल्याचा अनुभव आला आहे. भानामती व जादूटोणा असे कुठलेही प्रकार नसल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष किशोर बोदरे यांनी सांगितले.

बिनाखी गावांत वास्तव्यास असलेले कैलास गौतम यांच्या खोलीत गेल्या आठ दिवसापासून रहस्यमय प्रकार सुरु होते. घरातील भांडे पडणे, अचानक गॅस सुरु होणे, साहित्य जळणे, मोबाईल गायब होणे असे प्रकार सुरु असताना गौतम कुटुंबीय दहशतमध्ये आले होते. भूत, जादूटोणा तथा अन्य प्रकारची भीती कुटुंबियांत सुरु झाली होती. यासंदर्भात तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीला माहिती देण्यात आली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका संघटक राहुल डोंगरे, तालुकाध्यक्ष किशोर बोदरे, उपाध्यक्ष विजय केवट, सतीश पटले आणि पोलीस निरीक्षक विजय कशोधन यांनी सोमवारी (दि २१) सायंकाळी ७ वाजता कैलास गौतम यांच्या घरी भेट दिली. घरात तब्बल दोन तास थांबले. या कालावधीत अचानक गॅस सुरु झाली नाही. घरातील भांडे पडले नाहीत.

साहित्य अचानक गायब झाले नाही. जादूटोणा, भूत बाधा, भानामती असे कुठलेही प्रकार नाहीत. हा अंधश्रद्धाचा प्रकार आहे. गौतम कुटुंबियांत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जनजागृती केली आहे. यानंतर तीन दिवसापासून असा कुठलाही प्रकार कैलास गौतम यांचे खोलीत घडून आलेला नाही.

गावकऱ्यांची घटनास्थळी गर्दीया रहस्यमय प्रकाराचा उलगडा करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी आणि पोलीस विभाग आले असल्याचे कळताच गावकऱ्यांची उत्सुकता वाढली होती. शेजारी असलेल्या गावातील नागरीक गोळा झाले होते. राष्ट्रीय महामार्गावरही नागरिकांची गर्दी झाली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली.

"कैलास गौतम यांच्या घरी आम्ही पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. स्थितीचा आढावा घेतला. दोन तास थांबल्यानंतर असा कुठलाही प्रकार घडला नाही. कुटुंबियांत जनजागृती करण्यात आली. भानामती, जादूटोणा, भूत असे कुठलेही प्रकार नाहीत. अशा चर्चावर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये."- राहुल डोंगरे, तालुका संघटक, अंनिस 

टॅग्स :bhandara-acभंडारा