शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात गॅस कटरने फोडले एटीएम; सव्वा लाखांच्या नोटा जळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 09:38 IST

तुमसरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळील एटीएम पाच शस्त्रधारी तरुणांनी गॅस कटरने कापले. दरम्यान स्फोट होऊन एटीएम सेंटरच्या काचा फुटल्या. आवाजानंतर दरोडेखोर चारचाकी वाहनाने पसार झाले.

ठळक मुद्देपोलिसांनी केला पाठलाग पण आरोपी फरार

मोहन भोयर ।आॅनलाईन लोकमतभंडारा: तुमसरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळील एटीएम पाच शस्त्रधारी तरुणांनी गॅस कटरने कापले. दरम्यान स्फोट होऊन एटीएम सेंटरच्या काचा फुटल्या. आवाजानंतर दरोडेखोर चारचाकी वाहनाने पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला. परंतु दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. हा थरारक प्रकार सोमवारी रात्री ११.३० च्या दरम्यान घडला. दरम्यान यात १ लाख १२ हजार रूपयांच्या नोटा अर्धवट जळाल्या.तुमसर शहरात देव्हाडी मार्गावर भारतीय स्टेट बँक असून मुख्य गेटजवळ बँकेचे एटीएम आहे. रात्री ११.३० च्या सुमारास पांढऱ्या रंगाची (डीएल ३ सी - एएस ४९१३) चारचाकीतून पाच बुरखाधारी तरुण खाली उतरले. एटीएमला लागून असलेल्या यासीन ट्रान्सपोर्टमध्ये काम करणारा जसीन इसराईल (१७) तिथे उभा होता. बुरखाधारी एका तरुणाने देव्हाडीकडे जाणारा रस्ता त्याला विचारला. त्याच वेळी काही जण एटीएममध्ये होते. दरम्यान, एका दरोडेखोराने जसीनजवळील मोबाईल हिसकावून त्याला चारचाकीत कोंबले. त्यावेळी या दरोडेखोरांनी गॅस कटरने एटीएम कापण्याचा प्रयत्न केला असता तिथे आग लागली. या आगीत एटीएममधील १ लाख १२ हजार रुपयांच्या नोटा अर्धवट जळाल्या. या स्फोटात एटीएम सेंटरच्या काचा फुटल्या. मोठ्या आवाजामुळे दरोडेखोरांनी पळ काढला. जसीनने चारचाकीतून उडी मारून धूम ठोकली. धावत्या गाडीत इतर दरोडेखोर बसून देव्हाडी मार्गाने ते पसार झाले. तुमसर पोलिसांना ही माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांना सोबत घेऊन दरोडेखोरांचा पाठलाग केला.मौदाजवळील माथनी टोल नाक्याजवळ दरोडेखोर दिसले. यावेळी दरोडेखोर व पोलिसात चकमक झाली. पोलिसांनी दोन ते तीन राऊंड फायर केले, परंतु दरोडेखोर तेथून पसार झाले. या दरोडेखोरांचा कसून शोध सुरू आहे. जसीन इसराईल याच्या तक्रारीवर तुमसर पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर व दुपारी पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी एटीएमची पाहणी करून पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धुसर उपस्थित होते.एटीएम सुरक्षेकरिता चौकीदार राहत नाही. एटीएममध्ये नेमक्या किती नोटा होत्या, हे आताच सांगता येत नाही. सध्या तपास सुरू आहे.- संदीपन रॉय, शाखा प्रबंधक, भारतीय स्टेट बँक, तुमसर

टॅग्स :atmएटीएमCrimeगुन्हा