भंडारा : लाखनी तालुक्यातील मिरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. ग्रामस्थ, शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला हा सण अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळा मिरेगाव येथे वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून राज्यात आपले नाव कमावले आहे. त्याअंतर्गत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये सर्वंकष गुण आत्मसात करण्याचे प्रयत्नही सुरू आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच भारतीय संस्कृतीची ओळखही विद्यार्थ्यांमध्ये जागृत व्हावी, मोठ्यांचा आदर राखणे, मान राखने, या गोष्टी शाळेत आवर्जून सांगितल्या जातात. मुख्याध्यापक डमदेव कहालकर यांच्या प्रेरणेने व नागरिकांच्या सहकार्याने शाळेत गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी पालकगण व विद्यार्थ्यांची उत्साहाची भूमिका लक्षात घेत मुख्याध्यापक कहालकर तसेच त्यांच्या शिक्षक वृदांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. विविध सण, उत्सव साजरे का केले जातात व त्याच्या मागची ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा काय याचे महत्त्व ही मुख्याध्यापक कहालकर यांनी विद्यार्थ्यांना पटवून देत आहेत. या उपक्रमासाठी सर्वांचे सहकार्य लाभत आहेत.
मिरेगाव जिल्हा परिषद शाळेत गणेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:41 IST