शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

गांधींनी भारताला आत्मभान दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:28 IST

महात्मा गांधींनी भारताला अनेक आंदोलनाद्वारे राष्ट्रीयत्वाची भावना दिली. लोकशक्ती उभी केली. गुलामगिरीला जबाबदार आपणच सांगत, गुलामी मानसिकतेतून भारताला यशस्वीरीत्या बाहेर काढून आत्मभान दिले. पाश्चिमात्य संस्कृती मनुष्यहिताची नसून सत्यानाशकारक कशी हे आपल्या ग्रंथातून सिध्द केले, असे प्रतिपादन सेवाग्राम आश्रम वर्धेचे विश्वशांती यात्री जालंदरनाथ यांनी दिली.

ठळक मुद्देजालंदरनाथ : 'कृतिशील युवा प्रगतीशील देश' शिबिराचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा गांधींनी भारताला अनेक आंदोलनाद्वारे राष्ट्रीयत्वाची भावना दिली. लोकशक्ती उभी केली. गुलामगिरीला जबाबदार आपणच सांगत, गुलामी मानसिकतेतून भारताला यशस्वीरीत्या बाहेर काढून आत्मभान दिले. पाश्चिमात्य संस्कृती मनुष्यहिताची नसून सत्यानाशकारक कशी हे आपल्या ग्रंथातून सिध्द केले, असे प्रतिपादन सेवाग्राम आश्रम वर्धेचे विश्वशांती यात्री जालंदरनाथ यांनी दिली.गांधी जीवन व विचार तत्त्वांच्या माध्यमातून आयोजित 'कृतिशील युवा प्रगतीशील देश' या शिबिरात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी सेवाग्राम आश्रमात अनेक वर्षे राहिलेले ज्येष्ठ गांधीवादी हिरालाल शर्मा यांनीही समयोचित विचार मांडले.अध्यक्षस्थानी भारत स्वाभिमान न्यासाचे अध्यक्ष रामबिलास सारडा होते. शिबिर संयोजक प्रा. वामन तुरिले यांनी आभार मानले. प्रास्ताविक शिबिर सहप्रमुख महेश रणदिवे यांनी केले. याप्रसंगी जकातदारचे प्राचार्य धनराज हटवार, शिबिर निरीक्षक रणदिवे, जि.प. सदस्य प्यारेलाल वाघमारे, प्रा. नरेश आंबिलकर, डॉ.विजय आयलवार, विभावरी चवळे उपस्थित होते. शिबिराचा प्रारंभ स्मिता गालफाडे आणि सुरेशराव देशपांडे यांच्या क्रांतिगीतांना चाली लावण्याने झाला. याप्रसंगी भारत स्वाभिमान न्यासाचे अध्यक्ष उद्योजक तसेच शिबिर सहप्रमुख रामबिलास सारडा यांच्या हस्ते खादीवस्त्र देऊन सुनील भाग्यवानी, मित्र सुधीर बावणकुळे, प्रा. वामन तुरिले यांच्यासोबत एकनिष्ठेने काम करणारा युवक महेश रणदिवे, आपल्या यशस्वी नेतृत्वाने 'संस्कार' चळवळीला झळाळी मिळवून देणाऱ्या, पुणे विद्यापीठाने गौरव केलेल्या शिल्पा नाकतोडे यांचा शिबिरात सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी