शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

गांधीसागर तलावाची दुरवस्था

By admin | Updated: July 25, 2015 01:15 IST

तुमसर शहरातील एकमेव व जून्या गांधीसागर तलावाची दुरवस्था झाली आहे. तलावात वनस्पती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

स्वच्छतेची गरज : लाखोंचा खर्च व्यर्थ, प्रशासनाचे दुर्लक्षतुमसर : तुमसर शहरातील एकमेव व जून्या गांधीसागर तलावाची दुरवस्था झाली आहे. तलावात वनस्पती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सौंदर्यीकरणाच्या नावाखाली करण्यात आलेला लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याने त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.तुमसर शहरात आंबेडकर तथा गांधी वॉर्डात जुना गांधीसागर तलाव आहे. या तलावाचे क्षेत्रफळ सुमारे ५० एकरावर आहे. पालिका प्रशासनाने या तलावातील बालोद्यानावर सुमारे ८५ लक्ष रुपये खर्च केले. तलाव सभोवताल सिमेटीकरण, तलावात उतरण्याकरिता सिमेंट पायऱ्या, स्ट्रीट लाईटची सोय करण्यात आली आहे. एकमेव विरुंगळा व फेरफटका मारण्याचे स्थळ म्हणून गांधीसागर तलाव आहे. मागील काही वर्षात या तलावाकडे निश्चितच तुमसर नगरपरिषदेने लक्ष दिले आहे.तलावाच्या पश्चिमेस उत्तर व दक्षिण दिशेला तलावात प्रचंड मोठे गवत, वनस्पती व कमळांची वेल पसरलेली आहे. या वनस्पतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तलाव किनाऱ्यावर सध्या ही वेल मोठ्या प्रमाणात आहे. तलावाच्या सौंदर्यीकरणावर विशेषत: बांधकामावर मोठी रक्कम खर्च करण्यात आली. तलाव खोलीकरण करण्यात आले, बालोद्यान तयार करण्यात आले. त्यामूळे उन्हाळ्यात व हिवाळ्यात येथे तुमसरकरांची हजेरी लागत होते.तलावस्थळी प्रथम दश्य या कचरावजा, वनस्पतींचेच दिसून येते. त्यामूळे तलावाची दुरावस्था झाल्याचे चित्र दिसून येते. सौंदर्यीकरण व स्वच्छ करण्याचा विडा उचलणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी ग्रीन अ‍ॅन्ड क्लिन चा नारा दिला, पंरतु येथे तलाव क्लिन करण्याची गरज आहे.माईन्स प्रशासनाने गांधी सागर तलावाकरिता भरीव निधी दिला होता. पंरतु येथील बांधकामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, या प्रकरणाची शहरात केवळ चर्चा करण्यात आली. नगरपरिषदेला शासनाकडून शहर विकासाकरिता निधी प्राप्त होतो. या निधीतून हा तलाव क्लिन करण्याची गरज आहे. शहरात सध्या अनेक विकासात्मक कामे सुरु आहेत. या अंतर्गत गांधी सागर तलाव ग्रीन अ‍ॅन्ड क्लिन करण्याकरिता प्रयत्न करण्याची तसदी नगरपरिषद प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे. मागील १० ते १५ वर्षांपासून गांधीसागर तलाव एक देखणा तलाव तयार करण्याची केवळ चर्चा करण्यात येत होती. प्रत्यक्ष कामे हाती घेण्याची गरज आहे. शहर विकास व नियोजनाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. यात गांधी सागर तलाव शंभर टक्के सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव मांडण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)