शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळ आवश्यक

By admin | Updated: May 1, 2015 00:50 IST

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळाला महत्व द्यावे.

कोंढा कोसरा : विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळाला महत्व द्यावे. लहान वयात मुलांनी परीक्षा संपल्यावर ग्रीष्मकालीन शिबिरात सहभागी होऊन मन आणि शरीर मजबूत करावे, असे विचार संस्थाध्यक्ष अ‍ॅड. आनंद जिभकाटे यांनी गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोंढा येथे शिबिराच्या समारोपप्रसंगी व्यक्त केले.विद्यालयात १६ ते २५ एप्रिल दरम्यान ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप संस्थाध्यक्ष अ‍ॅड. आनंद जिभकाटे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्था उपाध्यक्ष रामदास शहारे, माजी पोलीस पाटील वामनराव जिभकाटे, प्रा. चरणदास बावणे, प्राचार्य जी.के. वैद्य, विश्वस्त मनोहर देशमुख, सुदाम खंडाईत, प्राचार्य विमल दुबे, मुख्याध्यापक सलामे, पर्यवेक्षक काटेखाये उपस्थित होते. यावेळी बोलताना अ‍ॅड.आनंद जिभकाटे म्हणाले, गांधी विद्यालय कोंढा येथील विद्यार्थी दरवर्षी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, क्रीडा स्पर्धेत यश मिळवित आहे. हे माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. मानवी जीवनात खेळाला खूप महत्व प्रत्येकांनी द्यावे. या शिबिरात २०४ विद्यार्थी सहभागी झाले. त्यांना कराटे, योगा, चित्रकला, ट्रॅकींग रोप यांचे प्रशिक्षण दिले. यावेळी १० दिवसाच्या प्रशिक्षणात काय प्राप्त झाले याचे मनोगत निखिता डाखोरे, मनोहर हटवार, श्रुती गिरडर, भावेश जिभकाटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिबिर प्रमुख डी.बी. पवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डी. बी. पटले, आभार आर.एन. भोपे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा प्रशिक्षक डी.बी. पवार, निशांत नेवारे, ऋषी सुपारे, आर. एन. भोपे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)