इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगेच्या पात्रात दोन मीटरपेक्षा जास्त खोलीपर्यंत दर्जेदार रेती आढळते. पूर आला की उपसलेल्या रेतीचा भरणा पुर्ववत व्हायचा. आजही ही नैसर्गिक प्रक्रिया सुरुच आहे. याच नैसर्गिक गौण खनिजाची वारेमाप लूट करीत रेती व्यवसायातून रेती तस्कर आणि महसूल अधिकारी-कर्मचारी आता गब्बर झाले आहेत. झोपडीवजा असलेल्या जागी बंगले दिसून येतात.रक्षकच भक्षक बनल्यावर विकास होणार तरी कसा, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. त्यातही स्वार्थी व घरभरु नियतीपुढे या रेती व्यवसायत अनेकांनी आपले चांगभले करुन घेतले. लक्षावधी रुपयांच्या घाटातून कोट्यवधी रुपयांची रेती उपसा करण्यात आली. विशेष म्हणजे अस्सल कमाई रेतीच्या खनन बंदीनंतर होत असते.सकाळी ६ ते सायंकाळचे ६ पर्यंत उपसा करण्याची परवानगी असतांना नेमक्या सायंकाळचे ६ ते सकाळच्या ६ वाजतापर्यंत रेतीचा उपसा करण्यात येतो. नियमांना बगल व रेतीची अवैध तस्करी महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरुनच केली जाते.तलाठ्यापासून ते खनीकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांशी साटेलोटे करुनच रेतीची लुट होत आहे.जिल्हा प्रशासनाला माहिती नंतर तर तस्करांना धाड मारणार याची कुणकुण आधी लागते. त्यामुळेच सर्व ऑलबेल असल्याचे दिसून येते. कारवाई झाली तरी दंड आकारुन सोडले जाते. काही ठिकाणी तर रेती तस्करांनी शक्कल लढविली. वाहतूक रेतीची असताना साहित्य मात्र धानाचा कोंढा वहन करीत असल्याचे सांगण्यात आले. वेळ प्रसंगी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याचे धाडसही रेती तस्करांनी केले आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेणे आवश्यक आहे.रॉयल्टी गडचिरोलीची तर रेती भंडाराचीभंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रेती अन्य जिल्ह्यात निर्यात केली जाते. यातही अवैध वाहतुक जोमात आहे. पवनी तालुक्यातील घाटांमधून निघणारी रेती चंद्रपूर, नागपूर व गडचिरोली जिल्ह्यात नेली जाते. यात तुमसर व मोहाडी तालुकाही मागे नाही. पवनी तालुक्यातील काही घाटांमधून रेतीचा उपसा केला जात असला तरी रेतीची रॉयल्टी ही गडचिरोली जिल्हा प्रशासनाने दिल्याच्याही घटना उघडकीला आल्या आहेत. तपासणीअंती रॉयल्टी गडचिरोलीची तर रेती भंडारा जिल्ह्याची असल्याची दिसून आली. एकंदरीत यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची मिलीभगत असल्याचे स्पष्ट होते.रस्त्यांचा जीव टांगणीलारेतीच्या अवैध वाहतूकीला अनेक निष्पाप जीव बळी ठरले आहे. भरधाव ट्रॅक्टर व ट्रकच्या धडकेने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तद्वतच वाहतूकीने रस्त्यांचेही हाल बेहाल झाले आहे. मोहाडी, तुमसर व पवनी तालुक्यातील काही रस्ते याचे बोलके उदाहरण आहेत. रेती माफीयांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र ही घोषणाही हवेतच विरली आहे. निधीचा वाणवा आणि कर्मचाºयांची मिलीभगत रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यात अयशस्वी ठरली आहे.
रेती व्यवसायातून तस्कर व महसूल अधिकारी झाले गब्बर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST
जिल्हा प्रशासनाला माहिती नंतर तर तस्करांना धाड मारणार याची कुणकुण आधी लागते. त्यामुळेच सर्व ऑलबेल असल्याचे दिसून येते. कारवाई झाली तरी दंड आकारुन सोडले जाते. काही ठिकाणी तर रेती तस्करांनी शक्कल लढविली. वाहतूक रेतीची असताना साहित्य मात्र धानाचा कोंढा वहन करीत असल्याचे सांगण्यात आले. वेळ प्रसंगी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याचे धाडसही रेती तस्करांनी केले आहे.
रेती व्यवसायातून तस्कर व महसूल अधिकारी झाले गब्बर
ठळक मुद्देझोपडीवजा जागेवर बंगले : अधिकारी, कर्मचारी बनले हातचे खेळणे, पोलीस यंत्रणाही दावणीला