शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
2
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
3
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
4
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
5
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
6
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
7
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
8
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
9
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
10
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
11
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
12
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
13
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
14
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
15
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
16
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
17
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
18
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
19
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
20
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?

एकाच दिवशी तीन जणांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 00:19 IST

एका जन्म-मृत्यू मानवी जीवनातील शाश्वत घटनाक्रम आहेत.

मोहगावदेवी येथील घटना : गावात शोककळा, तापमानाचा प्रभावलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : एका जन्म-मृत्यू मानवी जीवनातील शाश्वत घटनाक्रम आहेत. गावात कुण्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अख्खे गाव त्या कुंटुंबियासोबत असते. मात्र २४ तासांच्या आत एक नव्हे लागोपाठ तीन व्यक्तींच्या मृत्युने मोहगावदेवी हा गाव शोकसागरात बुडाला. मृत्युच्या मार्गाने प्रत्येकालाच जाणे आहे. मृत्यु ही नैसर्गीक चक्राची प्रक्रिया मानली गेली आहे, पण गावात मृत्युची साखळी बनून जात असेल तर निश्चितच कळायला मार्ग उरत नाही. अशीच दु:खदायी घटना मोहगाव देवी या गावात घडली. मिलिंद रामटेके या नावाचा विवाहित तरूणाचा मृत्यू शनिवारच्या रात्री झाला. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारच्या पहाटे हरी लेंडे यांचा मृत्यु झाला. त्यांच्यावर त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारीच सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान परसराम लेंडे या वृद्धाचे निधन झाले. यांच्यावर सुरनदी येथे सोमवारी सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. एका पाठोपाठ गावातील एक तरूण व दोन वृद्धांचे निधन झाले. एक झालं की दुसऱ्यांच्या अंत्यविधीला जाण्याचा दुर्देवी योग मोहगाववासीयांना आला. मोहगाव देवी येथील सरपंच राजेश लेंडे यांच्या कुटूंबातील दोन वृद्धांनी प्राण सोडले तर घरचा कमावता मिलिंद रामटेके गेल्याने कुटूंबातील पत्नी व मुलांवर दु:खाचे आभाळ कोसळले आहे.एकाच दिवशी तीन परिवारांना दु:खाचा डोहात सोडणारा दुर्देवी अनुभव जनतेनी बघितला आहे. सध्या उन्हाचा तडाखा फार आहे. दिवसभर उष्ण लाटा सुरू असतात. गावात वीजेची भानगड. कुलर चालत नाही. वीज राहत नाही. खंडीत होणारा वीज पुरवठा यामुळे गावकरी त्रस्त झालेली आहेत. स्वत:च्या बचावणासाठी बरीच जण गावातील पानठेल्यावर वा गावाशेजारच्या वृक्षसावलीत दिवस काढतात. पण, रात्री गेली वीज मरणयातना देवून जाते. याच बाबींचा परिणाम मोहगावदेवी व अन्य ग्रामीण भागातील जनतेला सोसावा लागतो. सुर्यदेव आग ओकत आहे. मोहगाव देवी येथे तर प्रचंड तापमानाच्या प्रभावाने वृद्ध मंडळींना जीव गमवावा लागत असल्याचा गावकऱ्यांचे जाहीररीत्या म्हणने आहे. इकडे ग्रामीण भागात सिंगल फेज असल्याने कुलरही फिरत नाही. अंगाची दाहकता शमवणारा गारवा ग्रामीण जनतेला मिळत नसल्याने उष्माघात प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्याच्या परिणामाने लोकांना नाहक जीव गमवावा लागत असल्याचे चित्र आहे.