शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अंत्ययात्रेत सहभागींवर मधमाशांचा हल्ला, ३० जण जखमी; नागरिकांत दहशत

By युवराज गोमास | Updated: October 7, 2023 16:11 IST

पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील घटना

भंडारा : पवनी तालुक्यातील कोदूर्ली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारकसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केला. ही घटना ६ ऑक्टोंबर रोजी शुक्रवारला सायंकाळी घडली. यात २५ ते ३० नागरिक किरकोळ जखमी झाले तर ५ नागरिकांना ग्रामीण रुग्णालय पवनी येथे दाखल करण्यात आले. 

होमगार्ड असलेले नाना मेश्राम यांची आई अजनाबाई मेश्राम यांचे गुरुवारला रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पार्थिवावर कोदुर्ली गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक व ग्रामस्थ स्मशानभूमीकडे जात असताना मधमाशांनी अचानक हल्ला केला. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात २५ ते ३० नागरिक किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमी झालेले नातेवाईक व ग्रामस्थांनी ग्रामीण रूग्णालय व खासगी रुग्णालय गाठून उपचार सुरू केला आहे. 

ग्रामीण रुग्णालयात सिंधू चव्हाण, सुशीला बनसोड, सुभाष चव्हाण, शुभम रामटेके, घनश्याम खोब्रागडे यांच्यावर उपचार करण्यात आले. मधमाशांचा हल्ला थांबल्यानंतर मोजक्याच नागरिकांच्या पुढाकारात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे नागरिकांची चांगली दमछाक झाली, एवढे मात्र खरे! जखमींच्या प्रकृतीत सुधारणा असल्याची माहिती रुग्णालय सुत्रांनी दिली आहे.

नदीतील पाण्यात, तणसीच्या ढिगांत लपले नागरिक

हल्ल्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी झालेले नागरिक घाबरले आणि वाट मिळेल त्या दिशेने सैरावैरा पळू लागले. यामुळे एकच खळबळ उडाली. स्मशानभूमीपासून काही अंतरावर प्रेत ठेवून काही नागरिक गावाच्या दिशेने तर काही जवळील तणसीच्या ढिगात लपले. काहींनी वैनगंगा नदीचे पाण्याचा उडी घेतली. परंतु, बराच वेळ मधमाशांनी पिच्छा सोडला नव्हता. त्यामुळे नागरिक चांगलेच घाबरले होते.

जिल्ह्यात १३ दिवसातील दुसरी घटना

तुमसर तालुक्यातील सालई शिवारात अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या शुभंम भोयर यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर बाम्हणी नदीघाट स्मशानभूमी शेजारी मधमाशांनी अचानक हल्ला केला होता. २३ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेत सुमारे २०० नागरिक जखमी झाले होते. नागरिकांनी वैनगंगेत उडी घेत बचाव केला होता. आता १३ दिवसानंतर पुन्हा अंत्ययात्रेवर हल्ला केल्याची ही दुसरी घटना जिल्ह्यात घडली.

टॅग्स :Accidentअपघातbhandara-acभंडारा