शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

बाल महोत्सवाच्या नावावर निधी स्वाहा!

By admin | Updated: June 18, 2016 00:19 IST

शासकीय संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना चालना मिळावी,

परस्पर दिले आयोजनाचे कंत्राट : माहिती अधिकारातून वास्तविकता उघडकीसभंडारा : शासकीय संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना चालना मिळावी, त्यांच्यात एकमेकांविषयी बंधूभाव, सांघिक भावना निर्माण व्हावी, यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यासाठी पाच लाख रूपयांचा निधी दिला होता. परंतु भंडाऱ्यात या निधीची परस्पर अफरातफर करण्यात आल्याचे वास्तव माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.सन २०१२-१३ या सत्रात तत्कालीन आघाडी शासनाने भंडाऱ्यात तीन दिवसीय बाल महोत्सव आयोजित करा, या आशयाचे पत्र ३१ जानेवारी २०१३ रोजी भंडारा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला पाठविले. हे पत्र आले त्याच दिवशी १५ ते १७ असा त्रिदिवसीय महोत्सवासाठी तत्कालीन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांची वेळ मागण्यासाठी गेले. त्याच दिवशी तत्कालीन पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकाला उद्घाटक म्हणून पत्रही पाठविण्यात आले. याशिवाय या कार्यक्रमात येणाऱ्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी कराव्या लागणाऱ्या व्यवस्थेसाठी वर्धा येथील नवनिर्धार मानव विकास संस्थेला कंत्राट देऊन टाकले. हा कार्यक्रम कंत्राटी पद्धतीने द्यायचा होता तर त्यासाठी कुठलिही निविदा मागविली नाही. असाच प्रकार सन २०१३-१४ या सत्रात जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रविंद्र चव्हान यांच्या कार्यकाळात उघडकीस आला. त्यावेळी महोत्सव आयोजित करण्याचे शासनाचे पत्र १९ डिसेंबरला या कार्यालयाला प्राप्त झाले होते. १८ ते २० असा त्रिदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले. यासाठी स्वामी विवेकानंद मानव सेवा संस्था नरवेल जि.बुलढाणा, नवनिर्धार मानव विकास संस्था वर्धा, जय अश्वमेघ फाऊंडेशन वर्धा या संस्थेला १३ जानेवारी रोजी या कार्यालयाकडून परस्पर पत्र पाठविण्यात आले. आपल्या कार्यालयाचे पत्र प्राप्त झाल्याचे सांगून या संस्थेने अर्ज केला होता. त्या तिन्ही पत्रावर एकाच व्यक्तीची स्वाक्षरी असल्याचेही माहिती अधिकारातून उघडकीस आले. २०१२-१३ या सत्रातही अर्ज केलेल्या संस्थेच्या पत्रावर एकाच व्यक्तीची सही आहे. या संस्थेला कार्यक्रमानंतर अग्रीम रक्कम देण्यात आली. त्यानंतर पूर्ण रक्कम देण्यात आली. २०१२-१३ या सत्रात शासनाला देण्यात येणारे टीडीएस कपात करण्यात आले होते. २०१३-१४ या सत्रात टीडीएस कपात करण्यात आले नाही. त्यातही शासनाचा महसुल बुडविण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)