शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा लाखांदूर तहसील कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: July 1, 2017 00:27 IST

शिवसेनेनी लाखांदूर तहसील कार्यालयावर जनतेचे अनेक प्रश्न घेऊन मोर्चा शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले व उपजिल्हा प्रमुख वसंत येंचीलवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.

अनेक समस्यांवर चर्चा : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शिवसेनेनी लाखांदूर तहसील कार्यालयावर जनतेचे अनेक प्रश्न घेऊन मोर्चा शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले व उपजिल्हा प्रमुख वसंत येंचीलवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. यावेळी परिसरातील शेतकरी, जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवेदन मधील मागण्यांप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीमध्ये अस्पष्टता व दोष दूर करून त्वरित अंबलबजावणी करावी, शेतकऱ्यांच्या कृषी मालाला माफक दर मिळण्याकरिता स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, सन २०११ मध्ये सर्वेक्षण होऊनही द्रारिद्य रेषेखालील यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही ती त्वरित प्रसिद्ध करण्यात यावी, कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर येथील जुने संचालक मंडळ व प्रशासकाच्या कार्यकाळातील गैरप्रकारात समाविष्ट असलेल्यांची चौकशी करून फौजदारी कारवाई करावी, लाखांदूर तालुक्यात एका गटसचिवाने शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी विशेष अंकेक्षण करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात द्यावा, वन हक्क कायद्या अंतर्गत प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, प्रतीक्षा यादी रद्द केल्यामुळे व नवीन यादी थोपल्यामुळे अनेक गरजू लाभार्थ्यांना घरकूल मिळण्यात झालेल्या अडचणी दूर कराव्या, आदी मागण्यांचा समावेश आहे. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी तहसीलदार संतोष महाले यांना निवेदन देताना शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष इंजि. राजेंद्र पटले, उपजिल्हा प्रमुख वसंत येंचीलवार, विजय काटेखाये, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित मेश्राम, तालुका प्रमुख अरविंद बनकर, राजू ब्राम्हणकर, किशोर चन्ने, दिनेश पांडे, तुमसर, महेश पटले, बंडूभाऊ लिचडे, नरेश करंजेकर, मनोहर जांगळे, परसराम बावनकर, भोजराज वैद्य, दिलीप सिंगाडे, रतन झिंगरे, विनायक सरोते, रुपेश साठवणे, रंजुताई निमजे, विमलताई तांडेकर, आदित्य नकाते, सतीश मिषार, अरविंद हटवार, विनोद साठवणे, वैभव चोपकर, सुभाष रोकडे, सचिन ठाकरे, निकेश राउत, भूषण भुते सह आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.