शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन लाखो रुपयांची फसवणूक; सायबर चोरटे नेहमी सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 12:32 IST

ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांत वाढ : पोलिसांची होतेय दमछाक

ऑनलाईन न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात अलीकडे ऑनलाइन पेमेंट व व्यवहार वाढीस लागले आहेत. यामुळे बँकांमध्ये जाऊन गर्दीत ताटकळण्याचा त्रास कमी झालेला आहे. परंतु, ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. सायबर चोरटे नेहमी सक्रिय राहून सामान्य लोकांच्या खात्यातून ऑनलाइन पैसे पळवितात. फसवणूक झालेल्या लाखो रुपयांतून हजारांतही रक्कम परत मिळत नाही, असे चित्र दिसून येत आहेत.

अनेकांच्या मोबाइलवर एक फोन येतो, कोणत्याही कारणानुसार ओटीपी मागितला जातो किंवा लिंकवर क्लिक करायला सांगितले जाते. तसेच, नवनव्या प्रकाराने ऑनलाइन गंडा घातला जातो. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात अनेक नागरिकांना अशा प्रकारचा ऑनलाइन गंडा घालण्यात आलेला आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी वेळीच पोलिसात तक्रार होणे गरजेचे आहे. परंतु बऱ्याचदा असे होताना दिसून येत नाही. 

ही व्यक्ती असतात टार्गेट सायबर गुन्हेगार शक्यतो वृद्ध नागरिक, महिला, तरुणी किंवा लहान मुले यांना आपले टार्गेट करतात. कारण, या व्यक्ती सायबर गुन्हेगारांच्या सहज जाळ्यात अडकतात. त्यामुळे फसवणूकच होऊ नये, यासाठी काय करायचे, हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे.

फसवणूक टाळण्यासाठी काय करावे? पैशांशी संबंधित किया बँक खाते, ई-वॉलेट यासंबंधी कुणी वृद्ध, महिला, तरुणी किंवा लहान मुले यांना माहिती विचारत असेल, तर त्यांनी आपल्या घरातील कर्त्या व्यक्तीच्या कानावर हा प्रकार तातडीने घालावा. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तत्काळ पोलिसांना कळवावे. सायबर चोरट्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी बँकेशी संबंधित कुठलाही तपशील देऊ नये, इतरांना ओटीपी, पिन सांगू नये, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता असते.

अशी घ्यावी खबरदारी फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे. ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार घडू नयेत, यासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला, मोबाइलवरून आलेल्या फोनला किंवा ई-मेलला प्रतिसाद देण्याची काहीही गरज नाही. अगदीच वाटले तरच त्यांना प्रतिसाद द्यावा. घरातील दोघा-तिघांना हा प्रकार सांगा. संबंधित व्यक्ती खोटी तर नाही ना, याची पडताळणी करून घ्या. त्याहीपेक्षा कोणीही तुम्हाला फोन करून तुमचे बैंक खाते, विमा पॉलिसी, ई-वॉलेट किंवा अन्य इंटरनेट व्यवहारांबाबत विचारणा करत असेल ना, तर त्यांना कोणतीही माहिती देऊ नये. 

पोलिस नियंत्रण कक्षाला कळवावेबँकेच्या तपशिलाबाबत विचारणा केली जात असेल तर ती व्यक्ती खरी आहे की खोटी आहे, यासंबंधी अधिक जाणून घ्यावे. त्यामुळे फसवणूक होण्यापासून वाचू शकाल. व्यक्ती खोटी बोलत असल्याचे समजल्यानंतर पोलिस ठाणे अथवा सायबर पोलिसात माहिती द्यावी. वेळीच पोलिसांना माहिती दिल्यास आरोपींना शोधणे सोपे जाते. परंतु, यापूर्वी पोलिस नियंत्रण कक्षाला तक्रार करूनही अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. सायबर चोरट्यांचा शोध घेण्यात पोलिसही बऱ्याच प्रमाणात अपयशी ठरताना दिसत आहेत.  

टॅग्स :fraudधोकेबाजीbhandara-acभंडारा