शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

आधारभूत धान खरेदीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:24 IST

यंदाच्या उन्हाळी हंगामात जवळपास ६ हजार ९५९ हेक्‍टर क्षेत्रात उन्हाळी पिकाची लागवड करण्यात आली. सदर लागवडीनुसार गत पंधरवड्यापूर्वीपासून ...

यंदाच्या उन्हाळी हंगामात जवळपास ६ हजार ९५९ हेक्‍टर क्षेत्रात उन्हाळी पिकाची लागवड करण्यात आली. सदर लागवडीनुसार गत पंधरवड्यापूर्वीपासून लागवडीखालील धान पिकाची कापणी व मळणी मोठ्या वेगाने सुरू आहे. शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेनुसार तालुक्यात मंजूर १६ आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत जवळपास ८ हजार १५२ शेतकऱ्यांनी सातबाराची नोंदणीदेखील केली आहे. मात्र तब्बल पंधरवडा लोटूनही तालुक्यात गोदाम सुविधांअभावी खरेदी सुरू न करण्यात आल्याने हजारो शेतकऱ्यांचे मळणी पूर्ण धान घरात व उघड्यावर साठवणूक केली आहे.

तथापि, सध्यास्थितीत गोदाम सुविधा उपलब्ध असलेल्या तालुक्यातील काही केंद्रांतर्गत जवळपास २८ हजार १५२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र गतवर्षीच्या उन्हाळी हंगामात तालुक्यात जवळपास साडेतीन लाख क्विंटल धानाचे उत्पादन घेण्यात आल्याची माहिती आहे. सदर धानाची तालुक्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत खरेदी करण्यात आली होती. या तुलनेत यंदा देखील उन्हाळी हंगामात तेवढ्याच धानाचे उत्पादन होण्याची शक्यता असून आतापर्यंत केवळ २८ हजार १५२ क्विंटल धानाची खरेदी झाली असताना उर्वरित धानाची खरेदी केव्हा केली जाणार? असा प्रश्न धान उत्पादक शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

दरम्यान, शासकीय योजनेनुसार तालुक्यात धान्य खरेदी केंद्र सुरू न झाल्याने अनेक शेतकरी धान साठवणुकीसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने खासगी व्यापाऱ्यांना प्रति क्विंटल ५०० ते ६०० रुपये कमी दराने विक्री करीत असल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याचीदेखील भीती व्यक्त केली जात आहे.

याप्रकरणी शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन येत्या ३० जूनपर्यंत तालुक्यातील तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी होण्यासाठी द्रुतगतीने धान खरेदी होण्यासाठी आवश्यक उपाययोजना व कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली जात आहे.

बॉक्स :

केंद्रचालकांकडून अवैध वसुली

उन्हाळी हंगामातील धान खरेदीसाठी तालुक्यातील १६ आधारभूत धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. त्यानुसार सदर खरेदी केंद्राअंतर्गत धान खरेदी सुरू करण्यात आली. मात्र तालुक्यातील काही धान खरेदी केंद्र चालकांद्वारा शेतकऱ्यांकडून अवैधरित्या गोदाम भाड्यासह प्रती क्विंटल ५० रुपयांची वसुली केल्या जात असल्याचा आरोप उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यात केला जात आहे.