शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आगीत चार घरे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 01:28 IST

सिहोरा गावात शनिवारच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास एका गोठ्याला आग लागली. त्यानंतर लोकांच्या ओरडण्याचा आवाज सुरू झाला आणि गावकरी जागे झाले. आणि पाहिले तर काय चार घरांना भीषण आगीने कवेत घेतले होते.

ठळक मुद्देसिहोरा येथील घटना : जीवनावश्यक वस्तुंसह लाखोंचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा गावात शनिवारच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास एका गोठ्याला आग लागली. त्यानंतर लोकांच्या ओरडण्याचा आवाज सुरू झाला आणि गावकरी जागे झाले. आणि पाहिले तर काय चार घरांना भीषण आगीने कवेत घेतले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी आग विझविन्याचा प्रयत्न केला मात्र आग इतकी जास्त होती की या आगीत चारही घरे जळून खाक झाली.अग्निशमन दलाला तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत लाखोचे सामान जळून राख झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध लागू शकलेला नाही.सिहोरा येथील झेंडा चौक परिसरात दाट लोकवस्ती आहे. तिथे घरे एकमेकांना लागून आहेत. दरम्यान, मध्यरात्री एका गोठ्याला आग लागली. त्यामुळे आगीच्या ज्वाळा पसरत एका पाठोपाठ चार घरांना कवेत घेतले.शनिवारला पहाटेच्या सुमारास घराला आग लागल्याचे काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर संपूर्ण गाव जागा झाला. आति त्या घराच्या दिशेने धाव घेतली. यात राजू तुरकर, कुंजीलाल तुरकर, भोलाराम तुरकर आणि दशरथ बिसने यांचे घर आणि जनावराचे गोठे जळून खाक झाले. या आगीत तीन ते चार लाख रूपयांचे नुकसान झाले असून आग लागण्याचे कारण कळू शकले नाही.आग विझविण्यासाठी अग्नीशमन विभागाला पाचारण करण्यात आले. या आगीत जीवनावश्यक वस्तू व जनावरांचा चारा, शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घटनास्थळाला जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर, गटनेते अरविंद राऊत, सरपंच मधू अळमाचे आणि ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी भेट देऊन पाहणी करून नुकसानभरपाईची मागणी केली. 

टॅग्स :fireआग