शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जंगलात चार तास पोलीस-चोरट्यांची लपाछपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:56 IST

पोलीस आणि मोबाईल चोरट्यांचा तब्बल चार तास लपाछपीचा खेळ पिटेसूर-आलेसूरच्या जंगलात रंगला. किर्र अंधाऱ्या रात्री, घनदाट जंगलात चोरट्यांना जेरबंद करण्यात भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्या जवळून ३१ मोबाईल हँडसेट, एलसीडी टिव्ही आणि कॉम्प्युटर मॉनिटर हस्तगत केला.

ठळक मुद्देसंडे अँकर । मध्य प्रदेशातील दोन मोबाईल चोरट्यांना अटक, एलसीबीची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पोलीस आणि मोबाईल चोरट्यांचा तब्बल चार तास लपाछपीचा खेळ पिटेसूर-आलेसूरच्या जंगलात रंगला. किर्र अंधाऱ्या रात्री, घनदाट जंगलात चोरट्यांना जेरबंद करण्यात भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्या जवळून ३१ मोबाईल हँडसेट, एलसीडी टिव्ही आणि कॉम्प्युटर मॉनिटर हस्तगत केला. या चोरट्यांनी गोबरवाही येथील एका मोबाईल शॉपीतून हा मुद्देमाल लंपास केला होता.पिंकेश राजू बिटले (१९) रा.दयतबर्रा जि. बालाघाट मध्यप्रदेश आणि प्रिंस छगनलाल सोनगडे (२०) रा.अर्जुनटोला ता.तिरोडी जि.बालाघाट अशी चोरट्यांची नावे आहेत. गोबरवाही येथील कांचन टेलीकॉम सर्व्हीसेस या दुकानात बुधवारी चोरी झाली होती. या घटनेची तक्रार गोबरवाही ठाण्यात देण्यात आली. सदर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांच्या अधिनस्त सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल पुरी यांनी केली. चोरी मध्यप्रदेशातील दोन चोरट्यांनी केल्याचे पुढे आले. त्यावरून पिंकेश राजू बिटले याला अटक करण्यासाठी पोलीस गेले. मात्र तो पिटेसूर, आलेसूर जंगलात लपून बसला होता. चार तास पाठलाग करून त्याला अटक केली. त्याची चौकशी सुरु केली असता या चोरीत प्रिंस सोनगडे हा सहभागी असल्याचे पुढे आले. त्यावरून त्यालाही पोलिसांनी अटक केली.भांडणाचा बदलाप्रिन्स व पिंकेश या दोन मोबाईल चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता गोबरवाही येथील मोबाईल शॉपी चालकासोबत रिचार्जवरून भांडण झाले आणि त्याचा बदला म्हणून आपण चोरी केल्याची कबूली दिली. मात्र यावर विश्वास ठेवायला पोलीस तयार नाही. यातील प्रिन्स हा बीएससी अंतिम वर्षापर्यंत शिकलेला असून पिंकेश हा फ्लोअर ब्लॉकचे काम करतो. या दोघांकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, ३१ मोबाईल हँडसेट, मोबाईल अ‍ॅसेसरी, एलसीडी टिव्ही, कॉम्प्युटर मॉनिटर असा १ लाख २९ हजार ९६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

टॅग्स :ThiefचोरMobileमोबाइल