मागील आठवड्यात १४ ते १८ एप्रिलपर्यंत शहरात लॉकडाऊन लावण्यात आल्याने त्याचा सकारात्मक परिणाम समोर आला. पुढील चार दिवसांत रुग्णसंख्या कमी झाली. संपूर्ण जनता कर्फ्यू असल्याने ‘ब्रेक द चेन’ यशस्वी झाले. त्यामुळे आता पुन्हा २२ ते २५ एप्रिलपर्यंत मोहाडी शहरात जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. या कालावधीत रुग्णालये, औषधी दुकाने सोडून इतर सर्व प्रकारची प्रतिष्ठाने व दुकाने बंद राहतील. त्यामुळे आवश्यक कामाव्यतिरिक्त विनाकारण कोणीही बाहेर रस्त्यावर आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जनता कर्फ्यूला जनतेनेच सहकार्य करून यशस्वी करावे, दंडात्मक कारवाई करण्याची वेळ आणू नये, कोरोना साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन तहसील, पोलीस, नगर पंचायत विभागातर्फे करण्यात आले आहे.
मोहाडीत पुन्हा चार दिवसांचा जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:36 IST