शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बर्फ कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:45 IST

शहरातील तकीया वॉर्ड परिसरात स्थित एमआयडीसीत एका बर्फ बनविणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने धाड घातली. यात मानकानुसार बर्फाची निर्मिती होत नसल्याची बाब लक्षात आली. अधिकाऱ्यांच्या तपासणीअंती जप्त केलेला बर्फ नष्ट केला.

ठळक मुद्देसाठा केला नष्ट : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील तकीया वॉर्ड परिसरात स्थित एमआयडीसीत एका बर्फ बनविणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने धाड घातली. यात मानकानुसार बर्फाची निर्मिती होत नसल्याची बाब लक्षात आली. अधिकाऱ्यांच्या तपासणीअंती जप्त केलेला बर्फ नष्ट केला.एमआयडीसी येथील रतन कोल्ड स्टोरेजमध्ये नियमानुसार बर्फ तयार करण्याची पध्दत अंमलात येत नसल्याचे निदर्शनास आले. खाद्य बर्फ उत्पादकाना निळा रंग टाकण्याच्या सुचना अन्न व औषध प्रशानातर्फे देण्यात आली होती. त्यानुसार शहरातील बर्फ बनविणाºया उत्पादकांनी निळा रंग टाकण्याची सुरुवात केली होती. परंतु रतन कोल्ड स्टोरेज येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी धाड घातली असता त्यावेळी दोन प्रकारचे बर्फ तयार होत असल्याची बाब उघडकीला आली. शासनाच्या नियमानुसार निळा बर्फ तर कंपनीमालकाच्या निर्णयानुसार पांढरा बर्फ तयार करण्यात येत होता.या संदर्भात कारखान्याचे मालक हरिभाई पटेल यांची चौकशी करण्यात आली. परंतु पटेल यांनी आपण खाद्य बर्फ बनवित नसल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. असे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी सांगितले.बर्फाच्या लाद्यांची तपासणी करण्यात आली. त्यात अर्धे बर्फ निळे तर अर्धे बर्फ पांढरे होते. खाद्य बर्फाचा नमुणा प्रयोगशाळेसाठी घेवून उर्वरित बर्फाचा साठा जनआरोग्याच्या दृष्टीने नष्ट करण्यात आला. तसेच पाणी चाचणी अहवालही नव्हता. कारखाना परिसर अस्वच्छ असल्याचेही निदर्शनास आले. ही कारवाई नागपूर विभागाचे आयुक्त मी. श. देशपांडे यांच्या मार्गदर्शनात सहा. आयुक्त ना. रा. सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी भाष्कर नंदनवार, पी.व्ही. मानवतकर यांनी केली.