शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पाच गावे दुष्काळग्रस्त!

By admin | Updated: January 7, 2017 00:29 IST

धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात पावसाचा अनियमितपणा, किडींचा प्रादुर्भाव आणि निर्सगाच्या प्रकोपामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

तुमसर तालुक्यातील चार गावांचा समावेश : ५० पैशापेक्षा अधिक पैसेवारीइंद्रपाल कटकवार भंडाराधानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात पावसाचा अनियमितपणा, किडींचा प्रादुर्भाव आणि निर्सगाच्या प्रकोपामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतरही जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची सुधारीत पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक घोषित केली होती, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील फक्त पाच गावे दुष्काळग्रस्त घोषित केली आहे. प्रशासनाचा हा जावईशोध म्हणावा लागेल. गत चार वर्षांपासून भंडारा जिल्हा निसर्ग प्रकोपाचा सामना करीत आहे. यावर्षी त्यात आणखी भर पडली. मृग आणि रोहणी नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या लांबल्या. शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. नंतरच्या काळात थोडा पाऊस बरसला. त्यानंतर पडलेल्या कडक उन्हामुळे पीक करपले. धानपिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढला. महागडी किटकनाशके खरेदी करुन पिक वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शेतकऱ्यांवर बिकट परीस्थिती ओढावली. कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या सुधारित पैसेवारीत पिक स्थिती उत्तम दाखवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील ८९१ एकूण गावांपैकी ८४६ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली होती. या गावांच्या खरीप पिकांची सुधारीत पैसेवारी जाहिर करण्यात आली. सर्व ८४६ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त दाखविण्यात आली होती. यावर्षी जिल्हा प्रशासनाने धान उत्पादक शेतकरी संकटात असतानाही सुधारीत पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक घोषित केली.यापैकी यात काही अंशी सुधारणा कारून जिल्हा प्रशासनाने साकोली तालुक्यातील एक तर तुमसर तालुक्यातील चार गावे दुष्काळग्रस्त घोषित केली आहेत. साकोली तालुक्यातील नवेगाव (रिठी) तर तुमसर तालुक्यातील चुल्हरडोह, आग्री, चिचोली, भोंडकी या गावांचा समावेश आहे. साकोली, लाखांदूर, पवनी, भंडारा, मोहाडी व लाखनी तालुुक्यातील एकही गावांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत नाही. प्रशासनाने ही पाच गावे दुष्काळग्रस्त घोषित केली असली तरी शासनाने याबाबत काहीच विचार केलेला नाही, हे येथे विशेष.